shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शुभांगी बाबर हिची राज्यस्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी ...

न्यू लॉ कॉलेज येथे विविध पुरस्कार देऊन शुभांगीचा सन्मान

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : दि . ६ /  न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर येथे आयोजित कै . न्यायमूर्ति एस. वी . म्हसे पा. सहाव्या राज्यस्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे पारितोषिक वितरण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ति शैलेश पी. ब्रम्हे यांच्या हस्ते झाले .
पारितोषिक वितरण दि . २८/०४/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता न्यू लॉ कॉलेज , नगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले . या स्पर्धेत न्यु लॉ कॉलेजची नावाजलेली सर्व परिचीत  विद्यार्थीनी शुभांगी शिवाजी बाबर हिने उल्लेखनीय कामगिरी केली .

शुभांगी बाबर ही  स्पर्धेतील प्रमुख विजेती ठरली असून तिला उत्कृष्ट वकील पारितोषिक तसेच बेस्ट मेमोरियल (BALLB 5th)  आणि महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला असुन न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर येथे पारितोषिक, रोख रक्कम, प्रशस्तीपत्र असे पुरस्कार मिळाले .

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाने उत्तम वकील घडविण्याचे कार्य केले अशी न्यायमूर्ती शैलेश पी ब्रम्हे  यांची कौतुकाची थाप शुभांगी बाबर हिला मिळाली .

याप्रसंगी न्यु लॉ कॉलेजचे प्राचार्य एम .एम .तांबे सर आणि शिक्षक वृंद यांनी शुभांगी बाबर हिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या . शुभांगी हिने मिळविलेल्या या यशाने सामाजिक , राजकिय सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे .
close