shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आनंद अनुभूती शिबिराचे श्रीरामपुरमध्ये आयोजन



श्रीरामपूर प्रतिनिधी:
आर्ट ऑफ लिव्हिंग चे संस्थापक परमपूज्य श्री. श्री. रविशंकरजी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर मध्ये भव्य आनंद अनुभूती शिबिराचे आयोजन ७ ते १२ मे दरम्यान करण्यात आले आहे.

दररोज सकाळी ६ - ०० ते ९ - ०० या वेळेत श्री दत्त मंदिर, दशमेशनगररोड, आदर्शनगर, सिंधी कॉलनीजवळ,श्रीरामपूर येथे हे शिबीर होणार आहे. यात योगा, प्राणायाम,ध्यान, ज्ञान व विश्वभारत प्रसिद्ध असलेली श्वसन तंत्रावर आधारित असलेली सुदर्शनक्रिया शिकवली जाणार असुन प्रशिक्षक म्हणून स्वामी ब्रम्हचैतन्यजी (बेंगलोर आश्रम) हे  मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. याच दरम्यान दररोज सायंकाळी ग्रामीण भागात ज्ञानसत्र आयोजित करण्यात आलेले आहे.
तसेच प पू श्री श्री रविशंकरजी यांचा १३ मे रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने हॉटेल गुरूव्हेज, नेवासा रोड येथे स्वामी ब्रम्हचैतन्यजी यांच्या उपस्थिती मध्ये गुरूपुजा सत्संग व महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त साधकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

*पत्रकार अफजल मेमन,श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close