shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

विशाल दादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त पदयात्रा संपन्न


श्रीमती जयश्री वहिनी पाटील यांची उपस्थिती लक्षवेधक

सांगली / गणेश आवटी

सांगली : दि .  5 /   लोकसभा निवडणूक 2024 19 एप्रिल ते 1 जून या सात टप्प्यांत होत असून मतमोजणी 4 जून  मंगळवार रोजी होईल असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

सांगलीवाडी येथे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल दादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त  श्रीमती जयश्री वहिनी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीवाडी येथे पदयात्रा काढण्यात आली. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 यावेळी  मीटिंग घेण्यात आली आणि  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ही करण्यात आले. सर्वांनी ७ मे रोजी जास्तीत जास्त मतदान करून आपला उमेदवार निवडुन आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते नागरिक यांनी मतदान करून मोलाची साथ द्यावी असे संबोधित करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित माजी नगरसेवक दिलीप पाटील , आनंदराव लेंगरे , संग्राम दादा पाटील ,आबा पाटील ,उदय पाटील ,बंडू कोळी व सांगली वाडी मधील प्रतिष्ठित नागरिक व कार्यकर्ते  उपस्थित होते .
close