अहिल्यानगर:-
दक्षिण अहिल्यानगरचे टेलिफोन चिन्ह मिळालेले लोकप्रिय उमेदवार दत्तात्रय आप्पा वाघमोडे राहणार मु.दहिगाव साकत पो. शिराढोन येथील विकास मुलगा शेतामध्ये दारे धरत होता. नेहमीप्रमाणे लाईटची लपाछपी चालूच होती.अचानक लाईट गेली म्हणून तो मोटर चालू करण्यासाठी गेला.
विहिरीत पाणी नसल्यामुळे फुटबॉल पाण्यात टाकण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान वायरचे शॉर्टसर्किट होऊन पाण्यामध्ये करंट उतरला व तरुण मुलगा जाग्यावर गेला. सदर घटना वाऱ्यासारखी समजतात पैलवान पानसरे यांनी त्या ठिकाणी भेट दिली.सदर घटना खूप दुःखदायक आहे . अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक घटना घडलेल्या आहेत. पाण्यासाठी अथवा शेतामध्ये पाणी देण्यास जाणाऱ्यांची अनेक कारणाने मृत्यू घडवलेले आहेत .तसेच लाईटची लपाछपी यामध्येही शेतकऱ्यांचे खूप मोठे हाल होत आहेत. लाईट कधी कधी रात्री येते त्या ठिकाणी जंगली प्राण्यांनचाही अनेक शेतकऱ्यांना सामना करावा लागलेला आहे. तर अनेकांना जीव गमावे लागलेली आहेत. काही शेतकरी कसेबसे अनेक संकटातून वाचल्याचे उदाहरणे सुद्धा आहेत. परंतु शासनाने याची कोणतीही कधीही गांभीर्याने विचारपूर्वक निर्णय घेतलेले नाहीत. दुभंगली धरनी माता फाटले आकाश ग कधी संपणार नाही शेतकऱ्याचा वनवास ग!
शेतकऱ्यांची काय अवस्था आहे. हे शेतकऱ्यांना माहिती. डोंगर फोडून उड्डाणपूल करून , समुद्राच्या खालून रस्ते बनवले जातात परंतु शेतकऱ्यांसाठी एवढं लाईट नाहीच पण पाणी असून आणता येत नाही हे आपलं दूरभाग्य आहे. लाईटचा अवघड प्रश्न आहे. फक्त घोषणा आणि घोषणा-घोषणाचा फक्त बाजार त्या कागदावरच.

