दि.३१ मार्च २०२४ अखेर बँकेच्या एकूण ठेवी ४९६ कोटी रुपयांच्या असून एकूण गुंतवणूक १०७ कोटी रुपये आणि तरलता गुंतवणूक ५४ कोटी आहे. बँकेचे कर्जवाटप ३४१ कोटी रुपये आहे. बँकेचा दि.३१ मार्च २०२४ अखेरचा एकूण व्यवसाय ८३६ कोटी रुपये आहे. बँकेचे खेळते भांडवल ५९१ कोटी रुपये आहे. दि. ३१ मार्च २०२४ अखेरचे नेट एनपीए चे प्रमाण ४.१३ % आहे. म्हणजेच बँकेने ५ % चे आत हेे प्रमाण राखले आहे.
बँकेच्या सध्या एकूण १३ शाखा कार्यान्वित असून अहमदनगर जिल्ह्यात ६ शाखा, पुणे जिल्ह्यात ४ शाखा व मुंबई येथे ३ शाखा आहेत. बँकेच्या संचालक मंडळात तज्ज्ञ मंडळी असून यामध्ये चार्टर्ड अकौंटंट व वकील आहेत. अशोक बँक लवकरच मोबाईल बँकिग सुरू करणार आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन ॲड्.सुभाष चौधरी यांनी दिली.
बँकेचे मार्गदर्शक व संस्थापक माजी आमदार चार्टर्ड अकौंटंट भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे, असे व्हा.चेअरमन भाऊसाहेब हळनोर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप थोरात यांनी सांगितले.
पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर**सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
संकलनसमता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

