shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शांत, संयमी, सुस्वभावी, अभ्यासू, शिस्तप्रिय, जाणकार मार्गदर्शक श्रीमंत ढोले सर यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा.. प्रा. विपुल वाघमोडे.

शांत, संयमी, सुस्वभावी, अभ्यासू, शिस्तप्रिय, जाणकार मार्गदर्शक  श्रीमंत ढोले सर यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा.. प्रा. विपुल वाघमोडे.
इंदापूर प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा थोर नेत्यांच्या समाजकार्याचा वारसा घेऊन महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी आणि दलितांच्या उत्कर्षाला डोळ्यासमोर ठेवून आदरणीय श्री.श्रीमंतजी ढोले सर यांनी समाजकार्यात उडी घेतली. 

एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले श्रीमंतजी ढोले हे शेतीची कामे करत करत लहानाचे मोठे झाले. जि.प. शाळा ढोलेमळा व लाखेवाडी या ठिकाणी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्री. शिवाजी विद्यालय बावडा या ठिकाणी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. आई-वडिलांना शेतीच्या कामात मदत करत करत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. हे करत असतानाच मित्र मंडळ, वाचन मंडळ इत्यादी सामाजिक उपक्रमातून समाजकार्य करण्यास सुरुवात केली. पुढे पदवीत्तर शिक्षणासाठी पुणे विद्यापीठात गेल्यानंतर तेथेही त्यांनी संघटना - समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जिथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले त्याच ठिकाणी शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. शिक्षक म्हणून नोकरी करत असताना गावातील सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेत गावातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या अडी अडचणींचा अभ्यास केला. हे सामाजिक कार्य करत असताना २००७ ला लाखेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये सर प्रचंड मताधिक्याने निवडून येत गावचे सरपंच झाले. मिळालेल्या संधीचं सोनं करत माननीय सरांनी आपल्या राजकीय ठसा उमटवण्यास सुरुवात केली. 

पहिलं धडाडीचे काम केलं ते म्हणजे लाखेवाडी गावामध्ये आठवडे बाजार सुरू केला तसेच सर्वसामान्यांचा श्रद्धास्थान म्हणजे मंदिर, गावातील सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार करून सर्व मंदिरांचा कायापालट केला आणि पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात प्रेमाचं व आदराच स्थान मिळवलं. छप्पर मुक्त गाव हे अभियान राबवून गावातील ३५६ लोकांना इंदिरा आवास योजनेअंतर्गत गुरुकुल बांधून दिली. गावातील पाणीपुरवठ्याची सोय केली. गावातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार हे केले. गावाला जोडणारे सर्व डांबरी रस्ते तयार केले तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ दत्तक योजना या योजनांचा लाभ गोरगरिबांना मिळवून दिला. स्वतः हाडाचे शिक्षक असल्याने ग्राम शिक्षण समितीचा अध्यक्ष या नात्याने शिक्षक- मुख्याध्यापक यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहिले. लहानपणापासूनच अवांतर वाचनाची गोडी लागण्यासाठी लहान मुलांना गोष्टीची तसेच थोर व्यक्तींच्या चरित्राचे वाटप केले, वह्या पेन इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले, गावातील जत्रा, पालखी, वृक्षदिंडी, वृक्षारोपण, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव यांच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केले आणि या सर्व कामाचे पुण्य म्हणून बावडा लाखेवाडी गणातील सर्वसामान्य जनतेने जिल्हा परिषद सदस्य म्हणून सर्वोच्च मताने सरांना निवडून दिले. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्यांनी कोणताही गट तट न मानता गरजू व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून काम करण्यास सुरुवात केली. पुढे जिल्हा परिषदेमधील अध्यक्ष-उपाध्यक्ष तसेच सर्व अधिकारी यांच्याशी त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केलं. जिल्हा परिषद सदस्य पदाच्या माध्यमातून त्यांनी प्राथमिक शाळांना भौतिक व शैक्षणिक सुविधा निर्माण करून दिल्या. काही शाळांना इमारत दुरुस्ती तर काही शाळांना नवीन इमारती बांधून दिल्या. शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण घेण्यासाठी संगणक  कक्षाची उपलब्धता करून दिली. खाजगी शैक्षणिक संस्था प्रमाणेच जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांचा गणवेश यामध्ये बदल करत शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल केले. यशस्वी राजकारण व समाजकारण करणारे सर हे यशस्वी प्रगतशील शेतकरी आहेत. परंपरागत शेतीला फाटा देत आधुनिकीकरणाची व तंत्रज्ञानाची कास धरत नवीन तंत्रज्ञान स्वीकारून शेतीची प्रगती केली व शेतमाल बाहेर परदेशामध्ये निर्यात करण्यापर्यंत मजल मारली. हे सर्व करत असताना आपल्या जन्मभूमी मध्ये म्हणजेच लाखेवाडी मध्ये मुंबई - पुणे यासारख्या ठिकाणचे शिक्षण हे माझ्या लाखेवाडी व लाखेवाडी परिसरातील पालकांच्या मुलाला मिळावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सन २०१८ साली लाखेवाडीमध्ये जय भवानीगड विकास प्रतिष्ठान नावाने शैक्षणिक संस्थेचे छोटेसे रोपटे लावले आणि या शैक्षणिक संकुलाचे बघता बघता मागील पाच ते सहा वर्षांमध्ये वटवृक्षांमध्ये रूपांतर झाले आहे. अतिशय सुसज्ज व सर्व सोयी सुविधा युक्त शिक्षण घेण्यासाठी या संकुलामध्ये पाच ते सहा हजार विद्यार्थी प्रवेश घेतलेले असून या सर्व विद्यार्थ्यांचा दर्जा उत्कृष्ट राहण्यासाठी नेहमीच आदरणीय सर प्रयत्नशील असतात. म्हणूनच तर अशा सर्व शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक व राजकीय क्षेत्रामध्ये सरांनी उत्तुंग भरारी घेत इंदापूर तालुक्यामध्ये आपले स्वतःचे एक अढळ स्थान निर्माण केले. अशा या शांत, संयमी, सुस्वभावी, अभ्यासू, शिस्तप्रिय, जाणकार लोकप्रतिनिधीला आमचा मानाचा मुजरा व वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा..

               शुभेच्छुक :
             प्रा. श्री.विपुल बबन वाघमोडे सर                                   अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती                             सदस्य ग्रामपंचायत काटी.

close