shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीरामपूरात विविध समाजाभिमुख उपक्रमांनी रेड क्रॉस दिन साजरा !


रेड क्रॉस सोसायटी कडून बसस्थानकाची स्वच्छता

श्रीरामपूर प्रतिनिधी:
जागतिक रेड क्रॉस दिनानिमित्त येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी श्रीरामपूर चे वतीने बसस्थानक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. बसस्थानकाच्या चारही बाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी सर्व आजीव सभासद सकाळी सहा वाजता स्थानकावर येवून दोन तास स्वच्छता केली.


यासोबतच रक्तगट तपासणी आणी नागरीकांच्या आरोग्याविषयक घेण्यात येणाऱ्या काळजीचे रेड क्रॉस सोसायटी द्वारे प्रबोधनात्मक मार्गदर्शन करण्यात आले.या स्तुत्य उपक्रमाचे प्रवाशांकडून कौतुक करण्यात आले, त्यानिमित्त रेड क्रॉसला धन्यवाद दिले.
रेड क्रॉस सोसायटी अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील ,उपाध्यक्ष तथा तहसीलदार मिलिंदकूमार वाघ यांचे मार्गदर्शनानुसार अभियान यशस्वी पार पडले.
स्वच्छता अभियानासाठी रेड क्रॉस सोसायटी सचिव सुनील साळवे, प्रवीण साळवे, श्रावण भोसले, राजेंद्र केदारी, विश्वास भोसले, साहेबराव रकते, सुरेश वाघुले, केशव धायगुडे, नानासाहेब मुठे, सोपान नन्नवरे, कांतिलाल शिंदे, डॉ.स्वप्नील पुरणाले, किरण सोनावणे, सचिन चंदन, ज्ञानदेव माळी, सुरजन साळवे बाळासाहेब पाटोळे, समद शेख, दिलावर पठाण, भाऊसाहेब कवडे,पुष्पा शिंदे, शोभा शेंडगे, निर्मला लांडगे, सविता साळुंके,स्वाती पुरे ,परी चंदन आदी आजीव सभासद उपस्थित होते, सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close