shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यातील सामाजिक पर्यावरणाची अधोगती


पर्यावरण साक्षरता लेख दुसरा. दि.२२/०५/२०२४

पुण्यातील भयानक प्रकार :  दारूच्या नशेत भरधाव गाडीने २ जणांना उडविले ज्यामुळे दोघेही जागीच मृत्यू पावले. या सर्व प्रकरणाचे खापर फक्त दारू या विषयावर फोडण्यात येत आहे. मुलगा अल्पवयीन होता त्याने दारू पिली. गाडीचा ड्रायव्हर असताना देखील त्याला गाडी चालवायला न देता त्या अल्पवयीन मुलाने गाडी चालविली. परमीटरूमच्या मालकांस अटक करण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलाला जामीन मिळालेला आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आलेली आहे. अशी वरवर वस्तुस्थिती जरी पाहिली तरी हा प्रकार घडला म्हणून याची चर्चा होत आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून पुण्यातील सर्वसामान्य नागरिक हे ढिसाळ कायदा सुव्यवस्थेचे बळी ठरत आहेत. 

प्रत्यक्ष रस्त्यावर अपघात होणे हा एक प्रसंग झाला. मात्र रोज रात्री पुण्यामध्ये ठीक ठिकाणी बरोबर बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी होत असते. ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची झोपमोड होते. फटाक्यांचे आवाज एवढे मोठे असतात की घरातील मांजर कुत्रे देखील भेदरतात. एकंदरीत सर्वसामान्य नागरिकांची झोपमोड होते. नंतर झोप येत नाही. रात्री अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील याचा खूप त्रास होतो. रात्री उशिरापर्यंत  रस्त्यावर फटाके फोडणारे कोण आहेत याचा बंदोबस्त आजपर्यंत झालेला नाही. अर्थात अशा बेशिस्त वर्तणूक करणाऱ्या घटकांच्या अतिरेकातून पुण्यातले सामाजिक पर्यावरण फारच धोक्यात आलेले आहे. विस्ताराने देण्यापेक्षा वाचकांनी विस्ताराने या घटनांचा विचार करावा. 
शासनाने रात्री उशिरापर्यंत पुण्यात चालणारी दंगामस्ती, परमिट रूम याच्यावरती निर्बंध घालावा.
धार्मिक कार्यक्रमांमध्ये जे वेळेसंदर्भात रात्रीचे निर्बंध घातलेले असतात तोच न्याय /कायदा परमिट रूमसाठी दिला तर हे प्रकार मोठ्या प्रमाणावर थांबू शकतात. महापालिका हद्दीत रात्री १.०० वाजेपर्यंत परवाना कक्ष चालू ठेवण्यास शासनाने अनुमती दिलेली आहे. वर्ष अखेरीस तर खास आदेशानुसार पहाटेपर्यंत ही अनुमती असते. यामुळे सहाजिकच रात्री उशिरापर्यंत युवा युवतींची वर्दळ चालू राहणे जितके स्वाभाविक आहे तितकेच त्यातून आपघात होणेही स्वाभाविक आहे. त्यातून मृत्यू येणे हे देखील स्वभाविक. 
केवळ रात्रीच्या फटाक्याच्या आतषबाजीमुळे अनेकांची झोपमोड होणे व पुढे रात्रभर झोप न येणे हे देखील जिवंतपणी मृत्यूचे जगणे नाही काय?
 रात्री उशिरापर्यंत मौजमस्ती करत फटाके फोडणाऱ्या युवा पिढीला दोष देणे चुकीचे असून शासकीय निर्बंधांचे ढिसाकरण हेच या सर्वांस कारणीभूत आहे.
एकंदरीत बेसुमार पद्धतीने वाढत चाललेल्या पुणे शहाराचे लवकरच बकाल शहरात रूपांतर होणार असे वाटते.
close