shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलच्या कॅरम स्पर्धेचे विजेते पुरुष गट सज्जाद शेख,महिला गट शेरॉन अल्वारिस


नारायण सावंत / मुंबई 
छ्त्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल विलेपार्ले व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या विद्यमाने या संकुलाची निर्मिती करणारे मुंबईचे माजी महापौर /माजी  आमदार डॉ. रमेश य. प्रभू यांच्या ८५ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे.
पुरुष गटात सज्जाद शेख (पी ॲण्ड पी ) याने अंतिम फेरीत वाजिद अन्सारी चा २५-१० ' २५-१६ पराभव केला.

महिला गटात अंतिम फेरी शेरॉन अल्वारिस ( CSMS S ) हिने जयमाला परब ( बोरिवली स्पोर्टस) हिचा २५ -१५ ' १२ -२५, २५ - १२ चुरशीच्या लढतीत पराभव केला.
बक्षिस समारभाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष सर्वश्री अरविंद प्रभू,सचिव डॉ. मोहन अ. राणे व मकरंद येडूरकर विश्वस्त. तसेच मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष प्र.चव्हाण,रमेश चव्हाण, संजय मणियार, उपाध्यक्ष गौतम जाधव,खजिनदार आदी मान्यवर उपस्थित होते.
close