shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुर्याने मुंबईची पत राखत हैद्राबादला नमविले


         आयपीएल २०२४ च्या ५५ व्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादने २० षटकात ८ गडी गमावून १७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने १७.२ षटकांत तीन गडी गमावून १७४ धावा करत सामना सात गडी राखून जिंकला. या विजयासह मुंबई गुणतालिकेत दहाव्या स्थानावरून नवव्या स्थानावर पोहोचली आहे. आता त्यांच्या खात्यात आठ गुण आहेत. त्याच बरोबर, निव्वळ रन रेट -०.२१२ असा काहीसा सुधारला आहे. तर सनरायझर्स हैद्राबाद १२ गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहे.


          मुंबईच्या या विजयात सुर्यकुमार यादव व तिलक वर्मा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. दोन्ही फलंदाजांमध्ये १४३ धावांची नाबाद भागीदारी झाली. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैद्राबादचे गोलंदाज संघर्ष करताना दिसले. त्याचा परिणाम मुंबईच्या फलंदाजांनी त्यांना नमवण्यात झाला.

          या सामन्यात सुर्याने ५१ चेंडूंचा सामना करत १०२ धावा अक्षरशः ठोकल्या. या दरम्यान त्याच्या बॅटमधून १२ चौकार आणि ६ षटकार बरसले. विशेष म्हणजे या सामन्यात सुर्याचा स्ट्राईक रेट २०० होता.  यासह ३६० डिग्रीकोनातून मैदानाच्या चोहीकडे फटकेबाजी करणारा सुर्यकुमार मुंबईसाठी दोन शतके झळकविणारा केवळ दुसरा फलंदाज ठरला. त्याच्या आधी रोहित शर्माने हा पराक्रम केला असून सुर्या रोहितच्या बरोबरीत आला आहे. मुंबई इंडियन्ससाठी  शतकं ठोकणारे इतर फलंदाज असे - रोहित शर्मा दोन, सुर्यकुमार यादव दोन, सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, लेंडल सिमन्स व कॅमरून ग्रीन प्रत्येकी एक शतक.

          मुंबईच्या या स्फोटक फलंदाजाने आपल्या टि२० कारकिर्दीतील एकूण सहावे शतक झळकविले. सर्वाधिक शतके करणारा तो पाचवा फलंदाज आहे.  या बाबतीत विराट कोहली नऊ शतकांसह आघाडीवर आहे. तर रोहित शर्मा ८ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात हिटमॅनला केवळ चार धावा करता आल्या. पॅट कमिन्सने त्याला पुन्हा एकदा आपला बळी बनवले.

          विजयी लक्षाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात धक्कादायक झाली. सलामीला आलेला ईशान किशन संघाच्या २६ धावा असतानाच बाद झाला. त्यानंतर ३१ धावांवर मुंबईला आणखी संघा दोन झटके बसले. कमिन्सने रोहितला बाद केले. मग भुवनेश्वर कुमारने पाचव्या षटकात नमन धीरला बाद केले. तो खाते न उघडताच परतला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि वर्मा यांनी मोर्चा ताब्यात घेतला. या दोघांनी हैद्राबादच्या गोलंदाजांचा चांगलीच खरपूस समाचार घेतला. स्कायने ५१ चेंडूंचा सामना करत नाबाद १०२ धावा केल्या, तर तिलक वर्माने ३७ धावांची खेळी केली. हैद्राबादकडून भुवनेश्वर, जेनसन आणि कमिन्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

          सुर्यकुमार आणि तिलक वर्मायांच्यात चौथ्या विकेटसाठी १४३ धावांची नाबाद भागीदारी झाली.  आयपीएलच्या इतिहासातील चौथ्या  विकेटसाठी मुंबईकडूनही सर्वात मोठी भागीदारी आहे. त्याचवेळी लक्ष्याचा पाठलाग करताना आयपीएलच्या इतिहासातील विकेटसाठी ही दुसरी सर्वोच्च भागीदारी ठरली.

          मुंबई इंडियन्ससाठी चौथ्या विकेटसाठी आतापर्यंत झालेल्या सर्वोत्तम भागीदाऱ्या पुढीलप्रमाणे - नाबाद १४३ धावा तिलक वर्मा आणि सूर्यकुमार  सनरायझर्स हैदराबाद विरूध्द वानखेडे, येथे सन २०२४मध्ये. कोरी अँडरसन आणि रोहित शर्मा नाबाद १३१, कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध ईडन गार्डनवर सन २०१५ मध्ये. किरॉन पोलार्ड आणि अंबाती रायुडू, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरूध्द बेंगळुरू सन २०१२ मध्ये नाबाद १२२ धावा. ईशान किशन आणि किरॉन पोलार्ड विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरूध्द, ११९ धावा, दुबई येथे सन २०२० मध्ये.

           १ जून पासून सुरू होऊ घातलेल्या टि२० विश्वचषकाच्या दृष्टीने आयसीसीचा अव्वल मानांकित टि२० प्लेअर सुर्यकुमार यादवचे झंझावाती शतक टिम इंडियासाठी बुस्ट ठरणारे आहे. मात्र त्याच्या शतकाचा व मुंबईच्या विजयाचा विद्यमान आयपीएलच्या गुणतालिकेतील अव्वल संघांवर विशेष काही परिणाम होईल असे वाटत नाही. मुंबईने उर्वरीत दोनही सामने जिंकले तरी ते फक्त तळाच्या दोन ऐवजी वरती सरकतील इतकं काय ते समाधान त्यांच्या खात्यात जमा होईल. नेहमी लेट चार्ज होणारी मुंबई इंडियन्स वेळ गेल्यावर चार्ज होत असून कर्णधार हार्दिक पांङ्याची नेतृत्वाची आकडेवारी सुधारण्याचे काम करत आहे इतकं महत्वाचं ठरत आहे.

लेखक : - 
डॉ.दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक. 
मो. नंबर -९०९६३७२०८२
close