shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी साजरी


पाटणबोरी प्रतिनिधी:
श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान पाटणबोरीचे वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी  साजरी करण्यात आली., प्रतिष्ठाणाचे आध्यक्ष जयंत भागानगरकर यांचे निवासस्थानापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत पादुकांची दिंडी सहित पालखी काढण्यात आली .अनेक महिला -पुरुष भाविक भक्त सहभागी झाले होते.

        कै.आबासाहेब तायडे कर्णबधिर विद्यालयात हा पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आला.प्रमुख रस्त्यावरुन फिरुन पालखी दिंडीने जनतेत जन जागृती निर्माण करण्यात आली.
  सर्वप्रथम पाठ, तारक मंत्र, जप व आरती करण्यात आली, व त्या नंतर बरोबर बारा वाजता महाप्रसादाला सुरुवात झाली. जवळपास पाचशे भाविक भक्तांनी प्रखर उन्हात येऊन श्री स्वामी समर्थ चरणी आपली निष्ठा अर्पण केली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठाणाचे अध्यक्ष जयंत भागानगरकर सचिव डॉ चंद्रकांत तायडे यांचे मार्गदर्शनाखाली उपाध्यक्षा: सौ. अंजली नालमवार, कोषाध्यक्ष शिवदास गंपावार सहसचिव सौ. संध्या भागानगरकर, गजानन मामीडवार, प्रफुल्ल कैलासवार, मोहन अर्गुलवार, सचिन जोशी, आनंद वैद्य, सौ, वैशाली जन्नावार, सारंग जोशी, शामराव मामीडवार आदींनी सहकार्य करत विशेष परिश्रम घेतले.

पत्रकार अक्षय रमेश तोटावार
पाटणबोरी ता.केळापूर जि.यवतमाळ 
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close