शहरातील नागरी समस्या दुर झाल्याने
परिसरात समाधानाचे वातावरण
श्रीरामपूर प्रतिनिधी:
"न.पा.घनकचरा विभागाच्या दुर्लक्षपणामुळे, गोंधवणीरोड कालव्याचे गटारीत रुपांतर"
या मथळ्याखाली दैनिक विदर्भ सत्यजित सह,दैनिक सार्वमत, दैनिक स्नेहप्रकाश, दैनिक राजनिष्ठा, दैनिक कॉमन न्यूज, या दैनिकांमध्ये तथा डेली हंट, शिर्डी एक्सप्रेस,मेमन रिपोर्टर, साई किरण टाईम्स न्यूज पोर्टल आणी विविध प्रसार माध्यमातून बातम्या झळकल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत जेसीबीच्या सहाय्याने सदरील घणकचरा साफ करण्याची सुरुवात केल्याने तथा नागरी समस्या दुर झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.यामुळे परिसरातील नागरीक श्रीरामपूर नगर पालीका मुख्याधिकारी व प्रशासक आणी संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना धन्यवाद देत आहेत.
शहराच्या आरोग्याविषयक ज्वलंत बाबी असाच संबंधित विभाग दक्ष राहिल्यास शहरवासियांची डास,मच्छरांपासून उद्भवणाऱ्या विविध आजारांपासून बचाव तर होईलच होईल शिवाय शहरही स्वच्छ आणी सुंदर राहील अशी अपेक्षाही शहरवासियांकडून व्यक्त केली जात आहे.
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

