shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बहुजन टाईगर फोर्स च्या वतीनेडॉ. सलीम शेख यांचा सत्कार !


शौकतभाई शेख / श्रीरामपूर
 काल मंगळवार दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी बहुजन टाईगर फोर्स श्रीरामपूर च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित भीमगीताच्या कार्यक्रमात श्रीरामपूर येथील बैतुशशिफा हॉस्पिटल चे संचालक डॉ. सलीम सिकंदर शेख यांचा सत्कार करण्यात आला. 


सलग वीस वर्षांपासून दरवर्षी पवित्र रमजान महिन्यात "  इस्लाम समजून घेताना" नावाची लेखमालिका दर वर्षी न चुकता संपूर्ण महाराष्ट्रात व देशात हजारों प्रसार माध्यमातून प्रकाशित करणेकामी उत्कृष्ट लिखाण केल्याबद्दल डॉ.सलीमभाई शेख यांचा बहूजन टाईगर फोर्स चे संस्थापक अध्यक्ष संजय रुपटक्के यांच्या हस्ते जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी दैनिक लोकमत चे माजी उपसंपादक मिलिंदकुमार साळवे, समाजसेवक गोरख आढाव, शंभूक विद्यार्थी वसतिगृहाचे अधिक्षक अशोक दिवे सर, समाजसेवक अशोकभाई बागुल, लहानुभाऊ त्रिभुवन आणि टायगर्स फोर्स चे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व आदि मान्यवर उपस्थित होते.
close