shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांकाची संकल्पना अनुकरणीय - अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी

पुणे येथे भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी- महाराष्ट्र यांच्याकडून अहमदनगर स्वीप समितीच्या 9002109003 व्हाट्सअप क्रमांकाचे विमोचन

अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
 मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण स्वीप उपक्रम राज्यात चालू आहेत.यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मदत होणार आहे. सक्षम लोकशाही समृद्ध करण्याकरिता प्रत्येक मतदाराने महत्त्वाचे योगदान देणे गरजेचे आहे.याकरिता "एक जिल्हा - एक व्हाट्सअप नंबर " या संकल्पनेवर आधारित अहमदनगर जिल्हास्वीप समितीचा देशातला पहिला स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांकाचा प्रयोग हा इतरांसाठी निश्चितच अनुकरणीय आहे. यामुळे स्वीप उपक्रमांचे संकलन सुलभ व सोपे होणार आहे व संपर्क साधण्यासाठी हा प्रयोग फार महत्त्वाचा आहे " असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी केले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,अहमदनगर सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार वैशिष्ट्यपर्ण स्वीप उपक्रम जिल्ह्यात वेग घेत आहेत. भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी-महाराष्ट्र यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी,पुणे येथे संपन्न झालेल्या स्वीप नोडल अधिकारी राज्यस्तरीय परिषद व प्रशिक्षण कार्यशाळेत अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या 9002109003 या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक उपक्रमाच्या विमोचनप्रसंगी कुलकर्णी बोलत होते. 
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आराधना शर्मा -वरिष्ठ सल्लागार -स्वीप, शरद दळवी -उप मुख्य निवडणूक अधिकारी, -जिल्हा अशोक कडूस-(स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी, अहमदनगर) डॉ अमोल बागुल (जिल्हा मतदारदूत) आदी उपस्थित होते.
संपूर्ण जिल्हाभरातील विविध प्रकारचे हजारो स्वीप उपक्रमांचे फोटो , कागदपत्रे ,वृत्तपत्र कात्रणे, पीडीएफ डॉक्युमेंट्स , ऑडिओ- व्हिडिओ क्लिप्स, जिंगल्स, रिंगटोन एकाच ठिकाणी संकलित होऊन या साहित्याचा जिल्ह्याच्या सोशल मीडिया व्यासपीठावर प्रसारित करण्यासाठी तसेच भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी-महाराष्ट्र यांना उपक्रम अहवाल  पाठवण्यासाठी या संकल्पनेचे उपयोजन होईल. म्हणून हा क्रमांक व या क्रमांकाचा क्यू आर कोड स्वीप समितीच्या सर्व प्रकारच्या मतदार जनजागृती प्रचार साहित्यावर वापरण्यात आलेला आहे,असे प्रतिपादन अशोक कडूस यांनी केले.सुमारे ३५ जिल्ह्यांमधून अहमदनगर जिल्ह्याला आपले स्वीप उपक्रम मांडण्याची संधी या कार्यशाळेत मिळाली.

उपक्रमासाठी राहुल पाटील (उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी ), मीना शिवगुंडे(स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी), आकाश दरेकर (स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी),प्रदीप पाटील (तहसीलदार-निवडणूक), बाळासाहेब बुगे (उपशिक्षणाधिकारी), प्रशांत गोसावी (निवडणूक नायब तहसीलदार) व सर्व स्वीप समिती सदस्यआदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close