shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जनकल्याण फाउंडेशनचा उपक्रम खुपच प्रेरणादायी- सुनिल गोसावी


 श्रीरामपूर प्रतिनिधी:
 परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने सहभागी असलेल्या प्रज्ञावंताचा गौरव करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचा जनकल्याण फाउंडेशनचा उपक्रम निश्चितच खुपच प्रेरणादायी असून पुरस्कार प्राप्त व्यक्तींना अधिकचे पाठबळ मिळेल असे प्रतिपादन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक, सचिव सुनील गोसावी यांनी केले.

मु.गोंडेगाव,पो.सलाबतपूर ता.नेवासा जि.अहमदनगर  येथील जनकल्याण फाउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ. बाबा आरगडे, प्राचार्य जी.पी. ढाकणे, सुभाष सोनवणे, डॉ.अशोकराव ढगे, प्रा.डॉ.अशोक कानडे, प्रा.डॉ. किशोर धनवटे, आनंदा साळवे व संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.    
        पुढे बोलताना श्री.गोसावी म्हणाले की, काही पुरस्कार माणसांना मोठे करतात तर काही पुरस्कार माणसांमुळे मोठे होतात. या दोन्हीही गोष्टी जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने घेतलेल्या या उपक्रमामुळे घडत आहेत,ही अतिशय आनंददायी गोष्ट आहे. कॉ.बाबा आरगडे बोलताना म्हणाले की,ग्रामीण भागात सातत्याने असा उपक्रम राबवून प्रेरणा देण्याचे काम फाउंडेशन करत आहे. तर प्राचार्य जी.पी. ढाकणे म्हणाले की, समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींची सध्या वनवा असून जे लोक समाजा साठी काम करतात त्यांचा असा सन्मान झाल्यास त्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल. सुभाष सोनवणे, डॉ.अशोक ढगे, डॉ.धनवटे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्रा.डॉ. अशोक कानडे यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे यांनी आभार मानले. सूत्रसंचलन प्रा.डॉ. संतोष तागड यांनी केले.
यावेळी डॉ. सुधाकर पेटकर, अशोक शर्मा, राणी शिरसाठ, बाळासाहेब कोठुळे, पत्रकार सुधिर चव्हाण, जालिंदर बोरुडे, शिवशाहीर विजय तनपुरे, ग्रंथपाल रघुनाथ दरदंले, मनिषा धनापुरे यांना राष्ट्र संत तुकडोजी महाराज पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आले. डॉ. शैलेंद्र भणगे, रज्जाक शेख, शितल धरम यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल विकास कर्डिले, अविनाश लोंढे, मयूर दाणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास कवी आत्माराम शेवाळे, मकरंद घोडके यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
*पत्रकार राजू मिर्जा* 
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन* 
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close