shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनिकेत देसाई अकाऊंट विषयात राज्यात प्रथम


 मिळाले १०० पैकी १०० गुण*

श्रीरामपुर प्रतिनिधी:
श्रीरामपुर तालुक्यातील नाऊर सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेवुन देखील चिरंजीव अनिकेत नवनाथ देसाई याने अकाऊंट या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यात  प्रथम येण्याचा बहुमान मिळवीला आहे. अनिकेत देसाई याने श्रीरामपूर येथील चंद्ररुप डाकले जैन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना इयत्ता बारावीच्या परिक्षेत एकुण ८५ % गुण मिळवीले तसेच अकाऊंट या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवुन तो राज्यात पहीला आला आहे. अनिकेत नवनाथ देसाई  हा पत्रकार देविदास देसाई यांचा पुतण्या आहे. त्यास सी.डी. जैन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, जी. एस. क्षिरसागर सर, व्ही. बी. दळवी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल आमदार लहु कानडे,साईबाबा संस्थानचे मा.विश्वस्त सचिन गुजर, अशोक उद्योग समुहाचे सर्वेसर्वा माजी आ.भानुदास मुरकुटे,पत्रकार देविदास देसाई,भास्करराव खंडागळे, समता फाऊंडेशन चे शौकतभाई शेख,दिलीप दायमा,सुहास शेलार,तिरंगा/ बिनदास न्यूज चे असलम बिनसाद,संदिप जगताप आदिंनी अभिनंदन केले आहे.

*पत्रकार देवीदास देसाई - बेलापूर
*सहयोगी : स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close