shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*हज यात्रेकरूंनी सर्वांसाठी दुआ करावी - मौलाना ईमदाद अली

यावर्षी श्रीरामपूरातून ७० पेक्षा जास्त हाजी पवित्र हज यात्रेसाठी जाणार


श्रीरामपूर प्रतिनिधी:
जीवनातून एकदा तरी हज यात्रा करावी ही प्रत्येक मुस्लिम धर्मियांची इच्छा असते. हज हा प्रत्येक ऐपतदार मुस्लिमावर फर्ज आहे. यावर्षी आपल्या श्रीरामपूर शहरातून मोठ्या संख्येने लोक हज यात्रेला जात आहेत.हे सर्व नशीबवान आहेत.आपण सर्वांनी मक्का आणि मदिना येथे गेल्यानंतर हजयात्रेचे सर्व विधी, सोपस्कार अदा करताना समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी तसेच सर्वांसाठी विशेष करून आपल्या देशासाठी व देश बांधवांसाठी प्रार्थना व दुआ करावी असे प्रतिपादन जामा मशिदीचे धर्मगुरू मौलाना मोहम्मद इमदादअली यांनी केले.

नगरसेवक हाजी मुक्तार शाह यांनी यावर्षी हज यात्रेला जाणाऱ्या सर्व हज यात्रेकरुंचा निरोप व सत्कार समारंभ त्यांच्या निवासस्थानी आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मौलाना मो. इमदाद अली बोलत होते. 

शहर काजी मौलाना सय्यद अकबर अली,नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख,ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण, महमूदअली खाकसार, गफ्फार पोपटिया,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नजीरभाई शेख आदींसह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शहर काजी मौलाना अकबर अली यांनी मला घडविण्यामध्ये मौलाना ईमदादअली यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या बोटाला धरूनच मी या क्षेत्रात आलो. ते माझे गुरु आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली माझ्या जीवनाची वाटचाल झाली आहे आणि आज हाज यात्रेची सुवर्णसंधी मला देखील प्राप्त झाली त्याबद्दल अल्लाहचे आभार व्यक्त करून माझ्याकडून काही चुकले असल्यास सर्वांनी माफ करावे अशी क्षमा याचना केली.
नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख यांनी हज यात्रेचा संपूर्ण प्रवास कशा पद्धतीने होणार आहे, त्यासाठी कोणते विधी कोणत्या ठिकाणी करावयाचे असतात याची इत्थंभूत माहिती आपल्या ओघवत्या शैलीतून दिली. नगरसेवक मुख्तार शाह यांनी आपले मनोगतातून सर्व हजयात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या.
यावर्षी हज कमिटी मार्फत श्रीरामपूर शहरातून सुमारे ६५ तसेच खाजगी टूर कंपनीतर्फे अनेकजण हज यात्रेस रवाना होत आहेत. टूर कंपनीतर्फे जाणारे यात्रेकरू रवाना झाले आहेत तर हज कमिटीतर्फे जाणारे श्रीरामपुरातील यात्रेकरू दिनांक २८,२९ व ३० तारखेला मुंबई विमानतळावरून रवाना होणार आहेत.
सर्व यात्रेकरूंना प्रवासामध्ये सुलभता,सोपेपणा तसेच चांगले आरोग्य मिळावे अशा शुभेच्छा यावेळी उपस्थितांनी दिल्या.

शहरातून यावर्षी हज यात्रेला जाणारे शहर काजी मौलाना अकबर अली,युसुफ पठाण, गणी पिंजारी सर,अनिस शेख सर, सय्यद इमाम सर, सलीम नूरमोहम्मद कुरेशी, शफीक हैदर शेख, मुजम्मील शकील शेख, सलीम फकीरमोहम्मद तांबोळी, सुलेमान शाह, फिरोज शाह, जाकिर चाँद सय्यद, सलीम कालू खाटीक, मो.खिझर बागवान, हुसेन बनेखान पठाण, अफसर सय्यद, राजू शेख, रशीद गुलाब शेख, आयुब गनी शेख, अल्लाबक्ष यासीन पठाण, दानिश पठाण आदींसह त्यांच्या कुटुंबीयांचा यावेळी मुक्तार शहा परिवारातर्फे हाजी रुमाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास गफार पोपटीया,कय्युम कुरेशी, नूरमोहम्मद जहागीरदार,

अहमद शाह, शकील कुरेशी, फिरोज शाह, रशीद कुरेशी,
 हुसेन इनामदार, तनवीर शाह,जावेद शेख, शरीफ मेमन, शोएब कच्छी,जब्बार पठाण, इब्राहिम भाई खाटीक, युनुस इनामदार, यासीन सय्यद, शब्बीर शेख,
 फिरोज मुंशी कुरेशी,मौलाना वाहेद अली, अय्युब शाह, मेहबूब शहा, गफार शाह, रज्जाक पठाण, रियाज पठाण, सय्यद जाकीर हुसेन, जोएफ जमादार, मोहम्मद कैफ शेख, बुरहानभाई जमादार, अमिन शहा, अकबर पठाण, अल्ताफ शाह, इकबाल काकर, सादिक शेख, महबूब उमरअली, सलमान शाह, इरफान शाह, अनिल इंगळे, सलीम शेख आदींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनवीर रजा यांनी केले तर आभार फारूक शाह यांनी मानले.

पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close