shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

२५६८ वा तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती सोहळा उत्साहात साजरा


वसमत प्रतिनिधी: 
येथील सम्राट कॉलनी इरिगेशन कॉलनी येथे तथागत गौतम बुद्ध यांची २५६८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपासक दिवाकर पुडगे हे होते प्रमुख पाहुणे सखाराम काळे, सुभाषराव कदम ,बबन इंगळे मिलिंद आळणे ,गुरुनाथ गाडेकर (समतादूत बार्टी) हे होते ,बार्टीकडून सामान्य ज्ञान संत महापुरुष यांच्या जीवनावर परीक्षा घेण्यात आली होती .तथागत गौतम बुद्ध जंयती निमित्ताने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. पहिला क्रमांक कु.पायल जोंधळे,दुसरा क्रमांक साक्षी कोल्हे,तिसरा क्रमांक सोहम आवटे उत्तेजनार्थ दिव्यांका इंगोले, समृद्धी एंगडे  बुद्ध पौर्णिमा, ज्याला बुद्ध जयंती देखील म्हणतात, हा बौद्ध धर्माचे संस्थापक सिद्धार्थ गौतम यांच्या जयंती स्मरणार्थ वार्षिक उत्सव आहे.जगभरातील बौद्धांसाठी हा एक महत्त्वाचा सण आहे, जो मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरा केला जातो. 
'बौद्ध' धर्माचे संस्थापक तथा मानवजातीला प्रज्ञा, शील, करुणा, समता, बंधुत्व इ. तत्त्वांची शिकवण देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

 या त्रिशरण आणि पंचशीलेच्या जयघोषात शुद्ध आचरण आणि सत्य बोलण्याचा संकल्प केला. शहरात ठिकठिकाणी व विहारांमध्ये धम्मप्रसाद म्हणून खीर वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी सखाराम काळे ,सुभाषराव कदम ,बबन एंगडे ,मेसाजी सागरे,भीमराव पुंडगे ,रघुनाथ पुंडगे ,पांडुरंग कोल्हे, नितीन कुंटवाड ,पुष्पाबाई कदम ,छायाबाई लाटे ,मनीषा दातार ,विमल जाधव सूत्रसंचालन विजय दातार यांनी केले आभार प्रदर्शन दिवाकर पुंडगे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने उपासक उपासिका बालक बालिका उपस्थित होत्या.


*पत्रकार मिलिंद आळणे - वसमत
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close