shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हरिगाव येथे बुद्धविहार रौप्यमहोत्सव उत्साहात...


श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील हरिगांव येथे बुद्धपोर्णिमा निमित्त बुद्धविहार येथे रौप्य महोत्सव मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.रौप्य महोत्सव निमित्त ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, तसेच ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव वैजापूरकर यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मिलीन्दकुमार साळवे हे होते.तसेच विचारवंत डॉ शिवाजीराव पंडित,वजन माप निरीक्षक औदम्बिकर,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, विजय पवार आदी प्रमुख उपस्थित होते.


प्रारंभी पंचशील ध्वजारोहण किरण खाजेकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी बाबुराव सूर्यवंशी, चंद्रकांत खरात,बबनराव जाधव,भाऊसाहेब लिहिणार, अशोक बोधक,नागेश पंडित, रावसाहेब पंडित,सौ लता हिवाळे,सौ पुष्पा गायकवाड, रवी गायकवाड,अक्षय खरात,सुषमा बोर्डे,सुषमा बोर्डे,राणी वैजापूरकर, भीमराज बागुल,आदी उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष मिलीन्द्कुमार साळवे यांनी प्रतिपादन केले की आज आपण महोत्सवास शुभेच्छा देत आहोत.बुद्ध विहार हे ज्ञानाचे केंद्र व्हावे.हरिगांवचा इतिहास शब्दबद्ध झाला पाहिजे.हरिगाव ही ऐतिहासिक भूमी आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर हे याठिकाणी येऊन गेले आहेत. एकेकाळी हे कामगार कष्टकरी चळवळीचे केंद्र होते. इथला इतिहास हा शब्दबद्ध लिहिला गेला पाहिजे.या साठी हरिगांवकरांनी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले.
याप्रसंगी सायंकाळी ५ वाजता दोनवाडी येथून भगवान गौतम बुद्धांची प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात आली. हरिगांव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ आल्यावर श्रीरामपूर न.पा.चे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी डॉ.आंबेडकर यांना अभिवादन केले.संपूर्ण हरिगांवातून भव्य मिरवणूक निघाली.आभार प्रदर्शन बुद्ध विहार सचिव चंद्रकांत खरात यांनी केले.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close