मा.खा.स्व.बळुभाऊ धानोरकर व स्व.वासुबावा गौड यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त पाटणबोरी येथे भव्य नेत्ररोग तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये २१० रुग्णांनी सहभाग नोंदविला तर ४० रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सांगवी येथे पाठविण्यात आले.
पाटणबोरी प्रतिनिधी:
पाटणबोरी ता.केळापूर जि.यवतमाळ येथे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी व जय अंबे शेतकी बहुउद्देशीय विकास संस्था पाटण बोरी यांच्या संयुक्त विद्यमाने मा.खा.स्व.बळुभाऊ धानोरकर व स्व.वासुबावा गौड यांच्या प्रथम पूण्यस्मरणा निमित्त मोफत भव्य नेत्ररोग तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरामध्ये जवळपास २१० रुग्णांनी तपासणी केली व ४० मोतीबिंदू शस्त्रक्रिया चे रुग्णांना मेघे सावंगी येथे पाठविण्यात आले .या कार्यक्रमांत मा.युवानेते जितेन्द्र मोघे तसेच शंकरआण्णा नालमवार, अमर पाटील , मल्लारेडी पाणाजवार, शिणू आण्णा नालमवार, राणीताई गौड ,सुरेश शर्मा ,रमेश गटलेवार,प्रमोद तोटावार, गजू राजूलवार ,अक्षय परशावार विनोद निंमलवर, शेखर सिडाम ,अतुल कणाके ,हाफिज जातू, डॉ.गजानन मठ्ठावार ,दयाराम सिडाम,मनोज भागानगरकर, चीनाय्या मिरलवार ,अक्षय तोटवार, रमेश कोमावार, संतोष जंगीटवार,रमेश वाज्जलवार,वासुदेव पिन्नमवार, रामलू अडपावार, राजू कोमावार, पंकज राजुलवार काशिनाथ शिंदे इत्यादी उपस्थित होते.
*पत्रकार अक्षय तोटावार- पाटणबोरी
*तथा तेलंगणा प्रदेश प्रभारी
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

