shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न


अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या  यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी परेडचे निरीक्षण केले.  परेडमध्ये पोलीस दल, महिला पोलीस दल, होमगार्ड, बँडपथक, यासह विविध दलांचा समावेश होता. 
याप्रसंगी पालकमंत्र्यांनी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेश देत उपस्थितांना महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, सर्व उपजिल्हाधिकारी, विविध विभागांचे विभाग प्रमुख यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close