shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर तालुक्यातील अकोळनेर येथे दत्तात्रेय भागूजी मेहेत्रे यांच्यावर वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल.

दिनांक 02/08/2024 रोजी शाखा अभियंता संदीप विठ्ठल बराट यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत वीज चोरी प्रकरणी केलेल्या कार्यवाही मध्ये अकोळनेर मधील रहवाशी दत्तात्रय भागूजी मेहेत्रे हे  मिटर साठी आलेल्या केबल व्यतिरीक्त अधिकची केबल टाकून वीज चोरी करत असल्याचे आढळून आल्याने त्यांना वीज चोरीचे सुमारे 13517 रूपये किमतीचे देयक व तडजोड रक्कम 2000 रूपये किमतीचे देयक देण्यात आले होते परंतु त्यांनी वेळेत वीज चोरीचे देयक न भरल्याने शाखा अभियंता संदीप  बराट यांनी नगर तालुका पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर  654   नुसार गुन्हा नोंदवला आले पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद गिते करत आहेत. 




close