shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बोराटवाडी विद्यालयात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ७८वा स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहण .


"बोराटवाडी विद्यालयात माजी मंत्री  हर्षवर्धन पाटील  यांच्या हस्ते ७८वा स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहण .
इंदापूर: लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण .हर्षवर्धन पाटील  यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न.
भारताच्या "७८" व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा श्री.शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा चे अध्यक्ष . हर्षवर्धन पाटील  यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले*. यावेळी *बोराटवाडी गावचे सरपंच .दत्तू सवासे, दूधगंगा चे संचालक .दयानंद गायकवाड,निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक .अजिनाथ दादा बोराडे ,.कृष्णा बोराडे,.रामभाऊ पाटील . तुकाराम बर्गे, .लालासो हेगडकर, .भीमराव फाळके,, .भिमराव गायकवाड, .रघुनाथ सवासे, .राजीव भाळे ,.पोपट सुद्रीक, .बाबा सुद्रीक, .प्रकाश खुसपे ,.विनोद सावंत ,.संजय गायकवाड .मोहन मारकड ,.तुकाराम इंगवले,.भारत मारकड पाटील,.अप्पासो पाटील, इ.ग्रामस्थ, पालकवर्ग व विद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.*   
 
       *क्रीडा शिक्षक .सदाशिव सावंत व .भीमराव खाडे  यांच्या मार्गदर्शनाखाली इ.9 वी व इ.10 वी तील विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली.*
    *इ.५ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांनी विशिष्ट प्रकारे रचना करत शालेय कवायती चे सादरीकरण केले*
           *कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य .भिमराव आवारे सर यांनी केले.विद्यार्थी मनोगतात कु.गितांजली गायकवाड हिने आपले मनोगत व्यक्त केले.*
     *अध्यक्षीय भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी शाळेच्या जडणघडणीचा आढावा घेतला. तसेच विद्यालयाच्या विकासाच्या दृष्टीने राबवायच्या कामकाजाची माहिती दिली.या विद्यालयाची घौडदौड वाखाणण्याजोगी आहे व त्यामध्ये ग्रामस्थ, पालकवर्ग यांचे मोलाचे योगदान आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक कार्यात सहभागी होणे ही काळाची गरज बनली असे विचार मांडले.*
    विद्यालयातील इ.१० वी मध्ये शिकणारा *विद्यार्थी चि.रोहित भोसले याने रेखाटलेले साहेबांचे चित्र त्याच्या हस्ते भेट देण्यात आले.*
      *इ. 10 वी , इ.12 वी मध्ये उत्तुंग यश संपादन केलेल्या  विद्यार्थ्यांना पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.* विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
          *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .अमर निलाखे सर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार .भीमराव खाडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.*

close