shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज रोटरीच्या वतीने गरजू मुलींना सायकल वाटप..!!



प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज येथील रोटरी क्लब ऑफ केज च्या वतीने केज तालुक्यातील विविध शाळांच्या गरजू व हुशार मुलींना स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने पाच सायकलचे वाटप केजचे तहसीलदार सचिन देशपांडे, केज पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक महाजन, केज रोटरी अध्यक्ष प्रकाश कामाजी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

येथील रोटरी क्लब ऑफ केज गेली एकोणीस वर्षांपासून केजच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहे. यावर्षी क्लबच्या वतीने विविध शाळांच्या कांही गरजू व हुशार मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले.   या मुलींची निवड शाळेच्या शिफारशी वरून करण्यात आली. या मुलींना सायकलची गरज असल्याने क्लब चे अध्यक्ष प्रकाश कामाजी, सचिव अनंत तरकसबंद, रोटरी डिस्ट्रिक्ट सहायक प्रांतपाल विवेक गंगणे आणि प्रोजेक्ट चेअरमन प्रवीण देशपांडे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केज तहसील कार्यालयाचे मुख्य ध्वजारोहण पार पडल्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार सचिन देशपांडे, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, रोटरी सहाय्यक प्रांतपाल विवेक गंगणे, केज रोटरीचे अध्यक्ष प्रकाश कामाजी व इतर मान्यवरांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले. 

चालू वर्षात केज रोटरी च्या वतीने विविध समाजउपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष प्रकाश कामाजी यांनी बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लब ऑफ केज चे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले यांनी केले.  
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन प्रवीण देशपांडे, विकास मिरगणे, सूर्यकांत चवरे, धनराज पुरी,  दादा जमाले, अरुण अंजाण, बापूराव सिंगण, पशुपतीनाथ दांगट, संतोष पिलाजी, बापूराव वाळके इत्यादी रोटरी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी केजचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close