राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्ते पदी डॉ. शशिकांत तरंगे यांची नियुक्ती.
इंदापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्ते पदी इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी गावचे सुपुत्र शशिकांत हरिदास तरंगे यांची नियुक्ती करण्यात आली असून तसे नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे . राज्याचे व पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रसारमाध्यमांमध्ये अधिकृत पक्षाची ध्येय धोरणे व भूमिका विचार मांडण्यासाठी आपली नियुक्ती करण्यात आली असून अभ्यासपूर्ण सहभागी व्हावे असे कोणतेही गैरसमज अथवा वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे पत्रात नमूद केले आहे.
शशिकांत तरंगे यांची राजकीय सामाजिक काम केले असून धनगर समाजाच्या आंदोलनातून राज्यभर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्टार प्रचारक म्हणूनही काम केले आहे.

