*क्रिएटिव्ह अकॅडमी इंदापूर आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*
इंदापूर: दि. 25 क्रिएटिव्ह अकॅडमी इंदापूर आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गुरुकृपा सांस्कृतिक भवन इंदापूर या ठिकाणी दि.25 रोजी संपन्न झाल्याची माहिती क्रिएटिव्ह अकॅडमीचे अध्यक्ष रघुनाथ बोंगाणे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी माजी शिक्षक आ.दत्तात्रय सावंत उपस्थित होते. दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे प्रस्ताविक रघुनाथ बोंगाणे यांनी केले.भीमराव वनवे माजी प्राचार्य रयत शिक्षण संस्था, भारत बोराटे, सेवानिवृत्त शिक्षक इंदापूर, हनुमंत बोंगाणे, नानासाहेब देवकर, माधव शिंदे, लंबाते एन.बी , रघुनाथ बोंगाणे, यांचा सत्कार संपन्न झाला.
मनोगत भीमराव वनवे, रमेश जाधव यांनी व्यक्त केले. स्पर्धा परीक्षा विषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये लहानपणापासूनच गोडी निर्माण करण्याचे काम क्रिएटिव्ह अकॅडमीच्या माध्यमातून रघुनाथ बोंगाणे सर करतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा मूलमंत्र देण्याचे काम अतिशय तळमळीने विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन करतात तसे विद्यार्थी देखील घडवतात असे आ. दत्तात्रय सावंत म्हणाले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माजी आ.दत्तात्रय सावंत सर यांच्या उपस्थितीत नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा 2024 आय.एम.विनर,नवोदय विद्यालय निवड, एन.एम.एम.एस परीक्षा इयत्ता आठवी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, मेडल, रोख रक्कम देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.40 मेडल,50 ट्रॉफी,रोख पारितोषिक रक्कम 9600 रुपये असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.115 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माझी शिक्षक आ.दत्तात्रय सावंत,रघुनाथ बोंगाणे,संतोष हेगडे,भीमराव वनवे,रमेश जाधव,गाढवे सर, समीर भाई अत्तार, संतोष जामदार,नानासाहेब देवकर, माधव शिंदे,लंबाते साहेब,महारुद्र कुंभार,साळुंके सर,बोंगाणे मॅडम शेख मॅडम , आप्पासाहेब यमपुरे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हेगडे यांनी तर आभार अतुल साळुंके सर यांनी मानले.

