महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे शिर्डी येथे दि 15 सप्टेंबर रोजी होणार भव्य पेन्शन अधिवेशनास हजारों संख्येने उपस्थित रहा - जिल्हाध्यक्ष बबन म्हाळसकर
इंदापूर शाखेचे वतीने पुणे येथील भव्य पेन्शन मोर्चा यशस्वीपणे पार पकडल्याबद्दल नुतन जिल्हा अध्यक्ष बबन म्हाळसकर व नुतन महिला आघाडी अध्यक्षा विद्या रोकडे यांचा सत्कार.
इंदापूर: दि 24 महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा शाखा पदाधिकारी व इंदापूर जुनी पेन्शन संघटना पदाधिकारी यांची केडगाव येथे सहविचार सभा संपन्न झाली. यावेळी नुतन जिल्हाध्यक्ष बबन म्हाळसकर व महिला आघाडी अध्यक्षा विद्या रोकडे यांचा सन्मान चिन्ह , फेटा , शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना म्हाळसकर यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी जुनी पेन्शन मागणीसाठी दि 15 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे संपन्न होणारे महाराष्ट्र जुनी पेशन संघटना राज्य महाअधिवेशानास हजारों संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी नुतन महिला आघाडी अध्यक्षा विद्या रोकडे यांनी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
प्रसंगी जिल्हा शाखेचे मिडिया प्रमुख सोमनाथ कुदळे , नेते संतोष गावडे , इंदापूर शाखेचे उपाध्यक्ष मनोहर जाधव , सरचिटणीस सागर भोसले , संजय भोंग , संतोष हेगडे , प्रताप शिरसट , विकास वाघ , नितिन कदम , रविंद्र लोखंडे , सोमनाथ शिंदे उपस्थित होते.

