shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संच मान्यता बाबतचा सुधारीत आदेश आठ दिवसात येणार - माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत.महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे वतीने विविध मागण्याचे निवेदन सादर.

संच मान्यता बाबतचा सुधारीत आदेश आठ दिवसात येणार - माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे वतीने विविध मागण्याचे निवेदन सादर.
इंदापूर: दि.२५ पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत कार्यक्रमाचे निमित्त इंदापूर तालुका दौरा असताना निमगाव केतकी येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे वतीने नको एनपीएस नको जीपीएस नको युपीएस फक्त जुनी पेशन योजना लागू करावी.१५ मार्च २०२४  संचमान्यतेबाबत शासन निर्णय रद्द करावा. वरिष्ठ वेतन त्रुटी दूर कराव्या याबाबत निवेदन देण्यात आले.
         यावेळी माजी शिक्षक आमदार म्हणाले संचमान्यता बाबतचे शुद्धीपत्रक लवकरच येईल. सर्वाना दिलासा मिळेल. त्याचप्रमाणे सर्वानी जुनी पेशन लागू करावी , वरिष्ठ वेतन त्रुटी दूर करणे संदर्भात तीव्र लढा उभारू असे सांगितले. यावेळी इंदापूर तालुका शाळा कृती समिती पदाधिकारी व जुनी पेशन संघटना  कार्याध्यक्ष सुनिल पवार , शिक्षक नेते भारत ननवरे , बापूराव जाधव , संतोष चोरमले , विकास भोंग उपस्थित होते.
close