shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पवार वस्ती जि.प. प्राथ.शाळेत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न


अजीजभाई शेख / राहाता 
तालुक्यातील वाकडी येथील पवार वस्ती याठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक २४/०८/ २०२४ रोजी वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बबनराव माळी उप सचिव वित्त विभाग महाराष्ट्र शासन हे सपत्नीक उपस्थित होते. वाकडी गावाचे लोक नियुक्त सरपंच सौ. रोहिणीताई आहेर, बाळासाहेब आहेर, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. वाकडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. रोहिणीताई आहेर, बाळासाहेब आहेर यांनी उप सचिव बबनराव माळी यांचा शाल, पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सत्कार केला. शाळेचे मुख्याध्यापक रामदास सोनवणे, शिक्षिका दीपमाला सातपुते मॅडम यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष किरण पवार, शंकर पवार, अक्षय पवार, बाळा पवार, सुनील पवार,      राहुल पवार यांनी देखील उप सचिव बबनराव माळी यांचा शाल, पुष्पगुच्छ,श्रीफळ देऊन सत्कार केला. विद्यार्थ्यांनी उत्तम पुष्पगुच्छ बनवले हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. सत्कार मुर्तींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

याप्रसंगी भव्यवृक्षारोपणाचा कार्यक्रम शाळेच्या आवारात आयोजित करण्यात आला होता. सरपंच सौ रोहिणी आहेर, बाळासाहेब आहेर,उप सचिव बबनराव माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.     शाळेचे मुख्याध्यापक रामदास सोनवणे यांनी आपल्या प्रास्ताविकात अनेक मुद्दे मांडले. दिपमाला सातपुते मॅडम यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. व कार्यक्रमाची सांगता वृक्षारोपणाने करण्यात आली.

*वृत्त विशेष सहयोग*
भाऊराव माळी
प्रदेश संघटक: 
स्वाभिमानी संपादक सेवा
 संघ (महाराष्ट्र प्रदेश )
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close