shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसी येथे ग्रंथालय दिन साजरा


कळंब- वालचंदनगर : येथील लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ  फार्मसी येथे राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. भारतीय ग्रंथालयाचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती ग्रंथालय दिन म्हणून साजरा करण्यात आली. ग्रंथालय दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शन व वाचन कार्यक्रम घेण्यात आला. 

ग्रंथपाल तुषार साबळे यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवन कार्याचा आढावा सांगितला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण उत्तेकर, संस्थेच्या मुख्य लेखापाल आखाडे मॅडम, ग्रंथपाल तुषार साबळे, प्रा. उल्का मोटे, प्रा. मीरा देवकर, प्रा.आरती चंदनशिवे व सर्व शिक्षक स्टाफ व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
close