shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कै.लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांकडून मॅराथॉन झाले संपन्न...!


कळंब:-
दिनांक 14-08- 2024 रोजी हर घर तिरंगा कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी कै.लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांकडून मॅराथॉन आयोजित करण्यात आले होते.  मॅराथॉन कै.लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेज पासून सुरू होऊन कळंब ग्रामपंचायत तसेच वालचंदनगर ग्रामपंचायत येथे जाऊन विद्यार्थी विद्यार्थिनींनी हर घर तिरंगा कार्यक्रमाची जनजागृती केली.

      या कार्यक्रमासाठी त्याचबरोबर मुलींना सुरक्षित साठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. 

        हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.उल्का मोटे,प्रा.वैष्णवी चोपडे,प्रा.श्वेता गीते, प्रा. मीरा देवकर,प्रा.स्वप्निल पाटील व ग्रंथपाल प्रा.तुषार साबळे यांनी मॅराथॉनच्या कार्यक्रम संपन्न करण्यासाठी समन्वयक म्हणून काम पाहिले. संस्थेचे अध्यक्ष उत्तम फडतरे यांनी मुलांना प्रोत्सहान दिले. तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ.प्रवीण उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला होता.
close