शिर्डी (संजय महाजन)
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पिंगाणे गावात ग्रामपंचायतीच्या विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री.प्रदीप पाटील(बाबा) खंडापूरकर यांच्या आदेशाने व प्रदेश अध्यक्ष (महिला विभाग)अँड.राणीताई स्वामी, प्रदेश अध्यक्ष श्री. पंडितजी तिडके, प्रदेशाध्यक्ष(निवड समिती) श्री.अनिल दादा देसले यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी शहादा भाग कार्यालयाच्या शेजारी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पिंगाने गावातील ग्रामस्थ, महिला भगिनी तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण विभाग) श्री.चंद्रकांत(जाधव)पाटील तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री.राजू सुकलाल भोई यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अर्धनग्न आमरण अन्नत्याग उपोषणास सुरुवात केलेली आहे.
पिंगाने ग्रामपंचायतच्या विविध शासकीय योजनेत मोठ्या प्रमाणात सरपंच, ग्रामविस विकास अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे झालेल्या चौकशी अहवालात निष्पन्न झाले आहे.तसेच विविध शासकीय योजनेत संबंधितांनी मोठ्या प्रमाणात अपहार केले असल्याचेही उघड झाले आहे. या कालावधीत ग्रामपंचायत नमुना नंबर 8 वर देखील बेकायदेशीर फेरफार बदल करण्यात आलेल्या चे निदर्शनास आले आहे. नमुना नंबर 8 वर फेरफारमुळेच पिंगाने येथील आमदार निधीतून मंजूर झालेल्या भोई समाजाचे समाज मंदिराचे काम अर्धवट अवस्थेत आढळून आलेले आहे. तसेच नमुना नंबर 8 च्या फेरफारमुळे अनेक गरीब ग्रामस्थ बेघरांपासून वंचित असल्याचे आढळून आले आहेत. त्या अनुषंगाने संदर्भ 1 नुसार पंचायत समितीच्या चौकशी अहवालातील आदेशात संबंधितांकडून अपोहाराची रक्कम वसूल करण्याचे आदेश तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना देण्यात आलेले होते.
तसेच संदर्भ 2 दोन नुसार संबंधितांवर अनियमिततेची व अपहाराची रक्कम ही वसूल करण्याची कार्यवाही करण्याचे नमूद असताना सुद्धा वसुली करण्यात आलेली नाही. या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने आदेशानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे सांगितले आहे. तरी मात्र त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही का करण्यात येत नाही यात मोठी शंका उपस्थित होत आहे. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन होत नसून त्यांच्या आदेशाला खालील पदाधिकारी सर्रास केराची टोपली दाखवीत आहेत. हे आंदोलन सन 2009 पासून ते आज पर्यंत पिंगाणे ग्रामस्थ, महिला भगिनी तसेच जिल्हा अध्यक्ष श्री.चंद्रकांत जाधव पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री.राजू सुकलाल भोई आंदोलन करीत आहेत. सन 2009 पासून आज पर्यंत कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नसल्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेच्या दिवसापासून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण विभाग) श्री.चंद्रकांत जाधव पाटील व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री.राजू सुकलाल भोई हे अर्ध नग्न बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत. या आंदोलनात पिंगाने गावातील ग्रामस्थ व मोठ्या प्रमाणात महिला भगिनी सहभागी झालेले आहेत. या अर्धनग्न बेमुदत उपोषणाला बसलेले उपोषण करते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अन्नाचा एकही कण देखील घेणार नसून त्यांच्या व इतर सर्व आंदोलकांच्या जीवितास कोणतीही जीवित हानी झाल्यास जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील ?.. असा पावित्रा आंदोलकांनी घेतलेला आहे. या आंदोलनाच्या बाबतीतील निवेदनाच्या प्रती पालकमंत्री मा.श्री.अनिल पाटील, माननीय खासदार अँड.गोवाल पाडवी नंदुरबार, आदिवासी विकास मंत्री माननीय डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा अधिकारी नंदुरबार जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक, सिव्हील सर्जन जिल्हा रुग्णालय, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, जी.प.उपविभागीय अधिकारी शहादा भाग, मा.तहसीलदार शहादा, मा. पोलीस निरीक्षक शहादा, मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा, यांना पाठविण्यात आल्या आहेत. पिंगाने ग्रामपंचायतीच्या विकास कामात अपहार व भ्रष्टाचार करून गावाची वाट लावणारे महाठग सरपंच,ग्रामसेवक बी.पी.सिसोदे, एस. आर.कोळी, भूपेंद्र राजपूत, गोविंद तडवी, महेंद्र पवार, दिनेश पावरा, श्री. गुरव अप्पा, महेश चौधरी, श्रीमती के. जे.वसावे, शितल अहिरे, श्री.बुधवंत आधी आहेत. विस्तार अधिकारी भगवान सूर्यवंशी, सुरेश देवरे, बी.एफ. निकुंम, हे आहेत .
या सर्व महाठगांना पाठीशी घालणारे जिल्हा परिषद नंदुरबार, महाठग अधिकारी यात पंचायत समितीचे श्री.कांगणे गटविकास अधिकारी, श्री.अजय पवार सहाय्यक गटविकास अधिकारी, श्री. सी.टी.गोसावी सहाय्यक गटविकास अधिकारी, या सर्व अधिकाऱ्यांना श्री. राघवेंद्र घोरपडे गटविकास अधिकारी हे पाठीशी घालत आहेत. गेल्या 14 ऑगस्ट पासून अर्ध नग्न उपोषणास बसलेल्या पदाधिकाऱ्यांचे फक्त शहादा रुग्णालयातील डॉक्टर्स वेळोवेळी तपासणी करून सहकार्य करीत आहेत. तसेच शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल उपोषणकर्त्यांजवळ थांबून आपले कर्तव्य बजावत आहेत. हे दोन डिपार्टमेंट सोडून गेल्या पाच-सहा दिवसापासून एकही गेंड्याच्या कातडीचे प्रशासकीय अधिकारी अर्धनग्न आमरण उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यां च्या तपासाला आलेले नाहीत. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील व शहादा तालुक्यातील लोकप्रतिनिधींचा सुसुळाट दिसून येत आहे ही फार मोठी शोकांतिका आहे. जोपर्यंत पिंगाणे ग्रामपंचायतीतील अपहारातील - सरपंच, ग्रामसेवक, विस्ताराधिकारी जेवढेही दोषी आढळून आलेले आहेत यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहील असेही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रकांत (जाधव) पाटील व श्री. राजू सुकलाल भोई यांनी सांगितले आहे. एकाही उपोषणास बसलेल्या पदाधिकारी तसेच महिला भगिनी यांच्या जीवितास हानी झाली तर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्राभर आंदोलन छेडेल असा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री.प्रदीप पाटील (बाबा) खंडापूरकर, प्रदेश अध्यक्ष (निवड समिती) श्री.अनिल दादा देसले तसेच साक्री तालुका संघटक श्री.प्रमोद श्रावण बोरसे यांनी दिला आहे. मग होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील.

