श्रीरामपूर / प्रतिनिधी:
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कोरोना मध्ये मृत पावलेल्या पालकांच्या मुला मुलींना तसेच गरजू २०० विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, स्क्वेअर बुक, कंपास पेटी असे शालेय साहित्य मोफत देऊन नाष्ट्याची व्यवस्था केली होती.
यावेळी विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन, रिपाई चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक नाना कानडे, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पीआय नितीन देशमुख, दत्तनगर चे माजी सरपंच पी.एस. निकम, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक उपाध्ये, वळदगावचे सरपंच अशोक भोसले, लहानु त्रिभुवन, रॉकी लोंढे,संस्थेचे सचिव लक्ष्मण पडवळ, बाळासाहेब जपे, संदीप धीवर, संघराज त्रिभुवन आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम श्रीरामपूर
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११

