shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौराईमळा शाळेत वृक्षांना राख्या बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे* *या निमित्ताने शाळेत सखी सावित्री समितीची स्थापना*

 *गौराईमळा शाळेत वृक्षांना  राख्या बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे*
      *या निमित्ताने शाळेत सखी सावित्री समितीची स्थापना*
      इंदापूर :  दिनांक २१/८/२०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या गौराईमळा शाळेत रक्षाबंधन साजरे करण्यात आले.विद्यार्थ्यांना आपल्या सणांचे महत्व पटावे व त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला असे शाळेतील उपक्रमशील शिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांनी  सांगितले. शाळेतील सर्व मुलींनी मुलांना ओवाळून राख्या बांधल्या व मुलांनी त्यांना ओवाळणी म्हणून पेन ,पेन्सिल व इतर वस्तु  भेट दिल्या .राखी बांधल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता.काही मुलींनी वृक्षांना राख्या बांधून निसर्गाचे व बहीण भावाचे अतूट नाते असते हा संदेश दिला.तसेच ज्या प्रमाणे आपण जीवनात भावाची काळजी घेतो त्या प्रमाणे झाडांना राख्या बांधुन भावा प्रमाणे झाडांची काळजी घ्यावी हा संदेश बाल गोपाळांनी दिला .
             यावेळी शासन निर्णय व जिल्हा परिषद पुणे यांच्या आदेशाने सन २०२४ :२०२५ मध्ये 'सखी सावित्री' समितीची स्थापना करुन त्याचे महत्व पालकांना व मुलांना सांगितले .या समिती मध्ये   श्री. अमोल संभाजी नाझरकरअध्यक्ष, श्रीम्, जुबेदा अब्बास पठाण शिक्षक महिला प्रतिनिधी ,श्री. दिपक चंद्रकांत शिंगाडे समुपदेशक ,श्रीम्. भजगवळी मॅडम आरोग्य प्रतिनिधी,
श्रीम्. सुनिता बबन सोनवणे अंगणवाडी सेविका, सौ. उषा वाघमोडे पोलिस पाटील, सौ. आश्विनी तात्यासाहेब शिंगाडे ग्रामपंचायत सदस्या ,सौ. मनिषा अमोल जाधव
पालक महिला प्रतिनिधी, कु. शिवकिर्ती अभिजित पवार , कु. श्रावणी रविंद्र होले विद्यार्थीनी प्रतिनिधी प्रसाद विनोद जाधव ,राहत राजु शेख विद्यार्थी प्रतिनिधी, श्री. प्रताप दिलीप शिरसट सचिव या पद्धतीने समितीची स्थापना करुन त्याचे  कार्य व कामकाजा विषयी मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर यांनी  माहिती सांगितली .शेवटी सर्व मुलांना  वडापाव देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
close