shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस लो.श.पाटील विद्यालयात साजरा.

विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून   हर्षवर्धन पाटील  यांचा वाढदिवस लो.श.पाटील विद्यालयात साजरा.
इंदापूर: लोकनेते शहाजीराव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोराटवाडी मध्ये महाराष्ट्र राज्याचे मा.सहकार व संसदीय कार्यमंत्री,राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष  हर्षवर्धन पाटील साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

विद्यालयातर्फे ६० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय बॅग,पाणी बाॅटल वाटप करण्यात आले.विद्यालयात हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला, रांगोळी व मेहंदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले.
         आज वाढदिवस असणारी कु.श्रृतिका खरात व कु.स्नेहा फडतरे व संस्कृती बोराडे या विद्यार्थिनींच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले. श्री.शिवाजी एज्युकेशन सोसायटी तर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना केक चे वाटप करण्यात आले.

   या कार्यक्रमासाठी बोराटवाडी गावचे सरपंच  दत्तू सवासे, दूधगंगाचे संचालक  दयानंद गायकवाड, कृष्णा बोराडे  , तुकाराम बर्गे,  तुकाराम इंगवले,  लालासो हेगडकर, रघुनाथ सवासे,   प्रकाश खुसपे, पोपट सुर्दिक ,  दिपक पवार,   संतोष गायकवाड ,  तसेच बोराडवाडी व पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.

          यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगतात चि.हर्षद सुद्रिक याने हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा आपल्या मनोगतात सांगितला तर मान्यवरांमधून  पमा आण्णा बोराडे   यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक,राजकीय कारकीर्दीचा आढावा सांगितला.
         या कार्यक्रमाच्या *प्रास्ताविकातून प्राचार्य  भिमराव आवारे सर यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या आजपर्यंतच्या जीवन प्रवासावर विचार मांडले.*           कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन  अमर निलाखे सर यांनी केले तर आभार   सचिन फडतरे सर यांनी मानले.

close