स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पडस्थळ येथे स्वच्छता अभियान
इंदापूर : बुधवार दि. 14 ऑगस्ट 2024 रोजी पडस्थळ ता. इंदापूर येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला निरंकारी मंडळाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शाळा परिसर,मंदिर परिसर स्वच्छता, ग्रामपंचायत कार्यालय, बस स्टँड, या ठिकाणाची स्वच्छता करण्यात आली. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना 'गाव स्वच्छ तर देश स्वच्छ'असा संदेश देण्यात आला. महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी देखील यावेळी आपला सहभाग नोंदवला. हे स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी पोपट वाघमोडे, गणपत पवार, भिवाजी आवटे, अनंता राऊत, अर्जुन चौगुले, गणेश कोळी,संभाजी रेडके, महेंद्र रेडके,मीराबाई वाघमोडे, मालनबाई कदम, मंगलताई पवार, रूपाली राऊत व संत निरंकारी मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. उद्या स्वातंत्र्यदिनी देखील पडस्थळ गावामध्ये विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.