उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे हर घर तिरंगा तीन दिवस झेंडावंदन घेण्यात येत असून दिनांक 14- 8 - 2024 रोजी सामाजिक कार्यकर्ते श्री सुहासजी ठाकरे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
तसेच महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोदजी पोतदार सर त्यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ कोरडे ,डॉ टिंगने, डॉ धोटे , श्री मनीषजी अग्रवाल, वैशाली घोगरे , शेख वसीम, शेख युसुफ, विनय शेलुरे, प्रशांत बेहरे, प्रकाश मंगळे,रूथ लोखंडे ,मीनाक्षी वगारे ,वर्षा दारोकर, जावरकर मॅडम, सुजित वानखडे ,आशिष नेरकर, श्रीकांत गोहाड, संजय महले, हरीश निंभोरकर, मीनाक्षी मेश्राम, सचिन इंगळे ,श्याम मोरे उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व व कर्मचारी वृंद हजर होते.