shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शासकीय वैद्यकीय महाशासकीयविद्यालयात "हिप रिप्लेसमेंट" च्या ५ शस्त्रक्रिया यशस्वी.

"करोना आजाराचा काळ गेल्यावर अनेकांना सांध्यांचे दुखणे वाढले. त्यावेळी जीव वाचविण्यासाठी देण्यात आलेल्या स्टेरॉइडचे दुष्परिणाम दिसून आले. गुडघ्याच्या वर खुब्यांच्या सांध्यांमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे सांध्यात प्रादुर्भाव दिसून येत असतो. "हिप रिप्लेसमेंट" साठी रुग्णालयात येऊन लाभ घ्यावा" 

-डॉ. राजकुमार सूर्यवंशी, विभाग प्रमुख, अस्थिव्यंगोपचार विभाग.

 

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार विभागात जिल्ह्यातील ५ गरजू रुग्णांवर "हिप रिप्लेसमेंट" ची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला असून वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाशासकीयविद्यालयात "हिप रिप्लेसमेंट" च्या ५ शस्त्रक्रिया यशस्वी.

                शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नव्याने मॉड्युलर शस्त्रक्रियागृह सुरु करण्यात आले आहे. या अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहात आता अस्थिव्यंगोपचार विभागात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया होत आहे. सध्या गेल्या महिन्यात ५ हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्यात. यात धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील शांताराम देशमुख(वय ७२), जळगाव येथील ललिता कोळी(वय ४१), रामेश्वर कॉलनी येथील अशोक शिवराम बारी (वय ५५) यांच्या एक तर जितेंद्र ठाकूर (वय ४०, रा. जळगाव) यांच्या दोन अशा पाच हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया झाल्या. 


सर्व शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी अस्थिव्यंगोपचार विभागाचे अभिनंदन केले आहे. शस्त्रक्रिया ह्या विभागप्रमुख डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेंद्र अग्रवाल, सहायक प्रा. डॉ. पंकज घोगरे, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. सुमित पाटील, डॉ. शहेनशहा शेख, डॉ. अमोल पाटील, डॉ. आदित्य जाधव, डॉ. निलेश पाटील, डॉ. सचिन वाहेकर, डॉ. प्रणव समृतवार, डॉ. हनुमंत काळे यांनी शस्त्रक्रिया केल्या. 

close