जीवाचीवाडी येथील लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे प्रवेशद्वाराचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण !!
प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
गावागावात ग्रामस्थ व माय-माऊल्या धनंजय मुंडे साहेबांच्या स्वागतासाठी रस्त्यावर; घरांपुढे रांगोळी अन औक्षण करून ओवाळणी
बऱ्याच वर्षानंतर केज तालुक्यातील जीवाचीवाडी, तुकूची वाडी आणि या परिसरात येण्याची संधी मिळाली. आज जागोजागी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि ज्या प्रेमाने माझे स्वागत केले ते प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. मुंडे कुटुंबावर असलेल्या या प्रेमातूनच आम्हाला जनतेची सेवा करण्याची ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अशीच साठवून ठेवीन व आपली सेवा करत राहीन, असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तुकोचीवाडी येथील जाहिर सभेत केले आहे.
जिवाचीवाडी येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रवेशद्वाराचे आज मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी जीवाचीवाडी तसेच तुकूची वाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास देखील भेट देत ग्रामदैवतांचे आशीर्वाद घेतले व गावकऱ्यांशी संवाद साधला.
धनंजय मुंडे हे केज तालुक्यातील जिवाची वाडी व तुकोची वाडी या गावांना भेट देण्यासाठी येत असताना धारूर तालुक्यातून केज तालुक्याच्या हद्दीत प्रवेश झाल्यानंतर तुकूची वाडी येथे पोहोचे पर्यंत रस्त्यातील प्रत्येक गावागावात वस्ती वस्तीवर धनंजय मुंडे यांचे स्थानिक ग्रामस्थांनी व माता-भगिनींनी स्वागत केले. घराघरांपुढे रांगोळ्या काढून तर औक्षण करून मायमाऊलींनी धनंजय मुंडे यांना भरभरून आशीर्वाद दिले.
दरम्यान राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाच्या लाभाच्या माहिती देण्यासह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते महिला भगिनींना पोहोचले आहेत का, असा प्रश्न धनंजय मुंडेंनी ग्रामस्थांशी सभेत विचारताच महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात 'होय' म्हणत शासनाचे आभार मानले.
पुढे बोलताना धनंजय मुंडे यांनी परळी वैजनाथ येथे येत्या 21 तारखेपासून सुरू होत असलेल्या पाच दिवशीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवास उपस्थित राहण्यासंदर्भात सर्व शेतकरी बांधवांना निमंत्रित केले. यावेळी माजी आमदार केशवराव आंधळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे, रमाकांत मुंडे, विजयकांत मुंडे, मुरलीधर ढाकणे, बंन्सीभाऊ मुंडे,सारंग आंधळे, नंदू दादा मोराळे, संजय केदार, बालाजी तांदळे, सुरेश घुले,जीवाचीवाडी गावचे दिपक काळे, सारुकवाडीचे युवा नेते वैभव महादेव केंद्रे,नागझरीचे सरपंच चंद्रसेन चौरे, रोहित हंगे, किरण राऊत, सुदर्शन घुले, यांसह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
पालक मंत्री धनंजय मुंडे यांना दोन गावातील विनापरवाना देशी-विदेशी विक्री बंद करण्याचे निवेदन महिलांनी दिले



