shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त बाबत गुन्हा दाखल व्हावा..इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिले इंदापूर पोलीस स्टेशनला निवेदन.

मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त बाबत गुन्हा दाखल व्हावा..

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिले इंदापूर पोलीस स्टेशनला निवेदन.
 इंदापूर: मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी अन मनाला संताप आणणारे आहे . केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे. मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करताना अशम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही
 या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यभरात  युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मुख आंदोलन  तसेच तहसीलदार  इंदापूर  यांना या घटनेच्या निषेदाचे निवेदन देण्यात येणार आहे. या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी .याची मागणी आपल्या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे. सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिभा आणि दैदिप्यमान शहर याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभारावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करण्यात येत आहे. अशा आशयाचे निवेदन पत्र देण्यात आले.

 यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, संदेश देवकर पाटील, सतीश पांढरे,प्रशांत गलांडे पाटील,  शिवाजी तरंगे, विठ्ठल महाडिक, सौरभ शिंदे, सोमनाथ जावळे, मुन्ना आरडे इत्यादी उपस्थित होते. सदर निवेदन इंदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे  यांना देण्यात आले.
close