श्रीरामपूर / प्रतिनिधी:
जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेवून जी भोंदूगिरी चालते त्याला आळा घालण्यासाठी व जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी श्रीरामपूर पोलिस स्टेशन मध्ये लवकरच अंधश्रध्दा निर्मूलन कक्षाची स्थापना करण्यात येणार असून त्यावर एका दक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली.
यासंदर्भात श्रीरामपूर तालुका अंधश्रध्दा निर्मूलन समिती पदाधिकाऱ्यांनी नितीन देशमुख यांना निवेदन दिले यावेळी समितीशी पो.नि.देशमुख माहिती देताना बोलत होते.
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे स्मृतिदिनानिमित्त त्यांचे पंधरा पुस्तकाचे प्रकाशन पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांचे हस्ते झाले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाप,सुनील साळवे,अध्यक्ष साहेबराव रकटे,कार्याध्यक्ष सविता साळुंके,सचिव निर्मला लांडगे,उपाध्यक्ष गणेश थोरात,अमोल सोनावणे, प्रवीण साळवे,पोपटराव शेळके,शोभा शेंडगे,सुभाष बोधक,अमोल नलावडे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११

