shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एल.जी. बनसुडे विद्यालयात* *रक्षाबंधन सण उत्साहात साजरा*

*एल.जी. बनसुडे विद्यालयात* *रक्षाबंधन सण उत्साहात साजरा* 
इंदापूर: पळसदेव (ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे विद्यालयात रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. राखी चे साधे धागे भाऊ आणि बहिणींच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक आहेत व त्यासाठीच रक्षासूत्र बांधतात यावर आधारित महाभारतातील कथा विद्यार्थ्यांना सांगून त्यांच्यामध्ये संस्कृती व कर्तव्य ही मूल्य रुजवण्यासाठी विद्यालयात हा सण साजरा करण्यात आला अशी माहिती प्राचार्या वंदना बनसुडे व मुख्याध्यापक राहुल वायसे यांनी सांगितले. प्री प्रायमरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राखी बनविण्याचा उपक्रम घेण्यात आला. ज्याप्रमाणे भाऊ बहिणींचे रक्षण करतो त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या रक्षणासाठी विद्यार्थ्यांनी झाडाला राखी बांधून रक्षण करण्याची शपथ घेतली. सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मुलींनी मुलांना राखी बांधून व मुलांनी त्यांना भेटवस्तू देऊन हा सण मोठ्या आनंदाने उत्साहाच्या वातावरणात विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला.
close