*लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय, बोराटवाडी मध्ये बहिण भावाचा स्नेहजोपासणारा रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न*
इंदापूर : विद्यार्थ्यांना सणांचे महत्त्व समजावे, त्यांच्यामध्ये बंधुभाव, एकात्मता निर्माण व्हावी यासाठी लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी मध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष *जेष्ठ शिक्षक श्री.वैभव सोलनकर सर तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे प्राचार्य श्री भीमराव आवारे सर होते*.
विद्यार्थी मनोगतात चि.ओम खुसपे इ.५वी ,कु.समृध्दी नरूटे इ.७ वी यांनी रक्षाबंधन या सणाचे महत्त्व सांगितले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सौ.वर्षा जगताप मॅडम यांनी रक्षाबंधन सण फक्त एक दिवसासाठी साजरा न करता शाळा हे कुटुंब समजून विद्यालयातील सर्व मुलींना बहिणीच्या प्रमाणे रक्षा करण्याची जबाबदारी प्रत्येक मुलाची आहे असे सांगितले. तसेच बहिण भावाच्या नात्यात असणाऱ्या निखळ,गोड, खोडकर अतूट नात्याची वीण कशी असते याचे वर्णन केले. अध्यक्षीय भाषणात श्री.सोलनकर सर यांनी सणाच्या मागील वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच रक्षाबंधन सणाचा पौराणिक कथेचा दाखले दिले.
*विद्यालयातील विद्यार्थीनींनी वृक्षाला राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा* संदेश दिला.*राखीची वैशिष्ट्यपूर्ण रचना करत रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा करण्यात आला*.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.ऐश्वर्या जाधव व कु.मृणाली डोईफोडे यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ.मनिषा गायकवाड मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याची सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले.

