श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील डि पॉल इंग्लिश मीडियम शाळेमध्ये भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. या वेळी आपल्या श्रीरामपूर मधील प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक जितेंद्र अशोक तोरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रगीत व ध्वजागीत शाळेतील मुलांनी खूप उत्साहाने सादर केले. व विविध घोषणा देण्यात आल्या. आणि इयत्ता १० वी. अ व ४ थी अ च्या विद्यार्थ्यांनी धुरा सांभाळली त्यात नृत्य मूक अभिनय भाषण असे कार्यक्रम सादर करण्यात आले. यानंतर बक्षीस समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी आपल्या भाषणात अत्यंत मोलाचे मुलांना मार्गदर्शन केले. व शाळेतील सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. आणि डि पॉल शाळेच्या सह शिक्षिका सौ. नीता वराळे जिल्हा गणित अध्यापक मंडळ या अहमदनगर जिल्हा आदर्श शिक्षिका मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेचे मॅनेजर फादर शिजू आणि ऍडमिनिस्ट्रेटर फादर फ्रॅंको आणि शाळेचे प्रिन्सिपल सिस्टर सेलिन सिस्टर यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल विचार व्यक्त केले. तसेच श्री. रवींद्र लोंढे, संदीप सर ,विकास वाघमारे, गणेश पवार सर, स्नेहलता नेववाणी, ज्योती ब्राह्मणे, मालन मोहन, शीना कुतुर, अनुराधा कपिले, रुकसाना पठाण, नंदा पवार, स्वाती गायकवाड, रेणुका टीचर आणि. दीपक कदम व सुनील बोरगे. यांचे मोलाचे सहकार्य लभले.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम श्रीरामपूर
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४११

