shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते मोहसिन ए मिल्लत विशेषांकाचे प्रकाशन

रोहित दादा वाकचौरे यांच्या हस्ते 
जॅगींग ट्रॅक वर ध्वजारोहण संपन्न 

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येथील सामाजिक कार्यकर्ते मोहसीन शौकत शेख संचलित मोहसीन ए मिल्लत कमेटी आणी सामाजिक कार्यकर्ते अजहरभाई शेख (ABS) मित्र मंडळ आयोजित वॉर्ड क्रं.१ इदगाह रोडवरील फातेमा हौसिंग सोसायटी समोरील कालवा जॅगींग ट्रॅकवर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे चिरंजीव रोहित दादा वाकचौरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तर याप्रसंगी मोहसीन शौकत शेख संपादित मोहसिन ए मिल्लत या विशेषांकाचे प्रकाशन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी रोहित दादा वाकचौरे,माजी उपनगराध्यक्ष हाजी अंजूमभाई शेख, मोहसिन ए मिल्लत कमेटी कार्याध्यक्ष हाजी इलाहीबक्ष कुरेशी,संपादक मोहसीन शौकत शेख, समता फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख,एबीएस ग्रुप प्रमुख अजहरभाई (ABS) शेख, मोहसीन ए मिल्लत कमेटी सहयोगी नदीम गुलाम, इब्राहिम बागवान, सरताज शेख,अफजल मेमन,हाजी फय्याजभाई बागवान, जाकीरभाई शहा, मुख्तार मनियार, मुश्ताकभाई शेख, इब्राहिमभाई शेख,
समवेत मानवता फाऊंडेशन चे सलिमखान पठाण, शेख नजीर गफूर (मामु), बुरहानभाई जमादार आणी मास्टर सरवरअली सय्यद, सलाऊद्दीन शेख आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मोहसीन शौकत शेख यांनी खासदारांकडे वॉर्ड क्रं.१ मधील जॅगींग ट्रॅक ची सध्या झालेली दुरावस्था या विषय लक्ष केंद्रित केले तथा सदरील जॅगींग ट्रॅक वर देखील वॉर्ड क्रं.७ जॅगींग ट्रॅक सारखी सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी केली.तर अजहरभाई शेख यांनी परिसरात बालवाडीची सुविधा नसल्याने लहान मुलांना शिकण्यासाठी इतर ठिकाणी पाठवावे लागत असल्याने सदरील परिसरात लहान बालकांना शिकण्यासाठी बालवाडीची सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी केली.तसेच मानवता संदेश फाऊंडेशन चे सलिमखान पठाण आणी अल्ताफ शहा सर यांनी औकाफ व विद्यार्थी मुलींकरीता शालेय फुल युनिफॉर्म आदि विषयी मागणी केली.

यावेळी ऍड.सादिक शिलेदार, ऍड.बाबा शेख, मजीदखान पठाण,अकील सुन्नाभाई शेख, जोएफ जमादार, डॉ.समीर ठाकूर, रज्जाक पठाण,जाकीर सय्यद सर, व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close