श्री.पळसनाथ विद्यालयात माजी विद्यार्थी विद्यार्थिनी १६ वर्षानंतर स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून आले एकत्र.
इंदापूर: ( आप्पासाहेब यमपुरे)
पळसदेव दि.१८ पुन्हा शाळेत यावे ... वर्गात बसावे... मित्र-मैत्रिणी भेटावे... मनसोक्त गप्पा माराव्यात... शिक्षकांना भेटावे... सर्व शालेय जीवन गत आठवणींनी उजळून निघावे... याकरिता पंधरा वर्षानंतर पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री पळसनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पळसदेव मधील सन 2008-09 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीत असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्यामध्ये विद्यालयातील सन 2008-09 मधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
आपल्या जुन्या शालेय आठवणींना उजाळा देण्यात आला शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्यामुळेच आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वतःच्या पायावरती उभा राहू शकलो व घडलो विविध खात्यांमध्ये नोकरी मिळाली व उत्तम शेतकरी बनू शकलो असे मत माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कालिदास गोडगे म्हणाले, शिक्षण म्हणजे वर्तनात बदल यानुसार प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणला व यशस्वी जीवनाला सुरुवात केली. अशा गाठीभेटीमधून आम्हालाही अभिमान वाटतो.
यावेळी मुख्याध्यापक विकास पाठक, संजय जाधव, विद्यालयातील माजी शिक्षक शेरखाने सर ,पठाडे सर, शिंदे सर ,निकम सर ,बडे सर, बांडे सर, बी एस काळे सर, व तानाजी इरकल, नितीन कुंभार हिराजी काळे अशोक जाधव, सुरेश बनकर, मल्हारी काळे, सदाशिव काळे, विजयकुमार उर्फ खंडू दादा काळे, जाधव मॅडम , लता गोडगे, सुवर्णा नायकवडी , वृषाली काळे मॅडम आदी मान्यवर माजी विद्यार्थी मित्र उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव काळे, सुनील बांडे यांनी केले तर आभार विष्णू फासे यांनी मानले.

