shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री योगेश्वरी देवी मंदिरातील २ कोटी ६० लाख रुपयांच्या विकासकामांना लवकरच सुरुवात-नमिता मुंदडा !!



आ. नमिता मुंदडांचा यशस्वी पाठपुरावा; आणखी दोन कोटींचा निधी होणार उपलब्ध

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवी मंदिर परिसरातील विकासकामांसाठी राज्य शासनाने २ कोटी ६० रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून विकासकामांना लवकरच सुरु होणार असल्याची माहिती आ. नमिता मुंदडा यांनी दिली. मंदिर परिसरातील विकासकामांना निधी मिळविण्यासाठी आ. मुंदडा यांनी दिड वर्षे सातत्याने पाठपुरावा केला होता. लोकसभेची आचारसंहिता सुरु होण्यापूर्वी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी मंदिराची पाहणी देखील केली होती. 


आ. नमिता मुंदडा यांनी रस्ते, आरोग्य, शिक्षण यासह धार्मिक स्थळांच्या विकासासाठी प्रयत्नपूर्वक भरघोस निधी आणून केज विधानसभा मतदार संघाचा परिपूर्ण विकास सुरु ठेवला आहे. आ. मुंदडा यांनी वर्षानुवर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाकडूनही केज मतदार संघात निधीचा वर्षाव करण्यात आला. मतदार संघात चौफेर विकासकामे गतीने सुरु आहेत. अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते.केज मतदार संघात आ.नमिता मुंदडा यांनी विकास कामांचा धडाका लावला आहे.त्यामुळे जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
close