shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोरी येथे वसुंधरा सोशल फाउंडेशन आयोजित भव्य क्रिकेट सामन्याचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले क्रिकेट संघ मळद.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोरी येथे वसुंधरा सोशल फाउंडेशन आयोजित भव्य क्रिकेट सामन्याचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले क्रिकेट संघ मळद.
इंदापूर: बोरी ( ता. इंदापूर) येथे वसुंधरा सोशल फाउंडेशन आयोजित महाराष्ट्राचे माजी सहकार आणि संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य किटकॅट क्रिकेटच्या सांगण्याचा उद्घाटन सोहळा दिनांक 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला होता यावेळी त्यांनी प्रत्यक्ष ग्राउंड वरती फलंदाजी करून प्रारंभ केला होता या सामन्याचा समारोप आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी झाला असून यामध्ये सामन्यांचा निकाल खालील प्रमाणे 

प्रथम पारितोषिक 31,000/-
क्रिकेट संघ मळद

द्वितीय पारितोषिक 17,000/-
क्रिकेट संघ अकलूज

तृतीय पारितोषिक 10,000/-
जय मल्हार क्रिकेट संघ,बोरी.

*चतुर्थ पारितोषिक 7,000/-*
**क्रिकेट संघ माळेगाव.*

*पाचवे पारितोषिक 5,000/-*
*महाकाल क्रिकेट संघ बोरी.*

*सहावे पारितोषिक 3,000/-*
*सेव्हन स्टार क्रिकेट संघ बोरी.*

*सातवे पारितोषिक 2,000/-*
*पुण्यश्लोक आहिल्यादेवी क्रिकेट संघ बोरी.*

यावेळी वसुंधरा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष वैभव देवडे यांनी सर्वच यशस्वी संघांचा अभिनंदन केले.
याप्रसंगी अंतिम फेरीतील दोन्ही संघातील खेळाडूंना आंब्याचे रोप भेट देऊन झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला.
तसेच गेली चार दिवस चालू असलेल्या सामन्यांच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचे सोशल फाउंडेशन च्या वतीने आभार विशेष आभार मानण्यात आले.


close