माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन व वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा संपन्न.
इंदापूर: इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील * यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर मधील श्री नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन व वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, यामध्ये 20 वैज्ञानिक प्रयोग सादर करण्यात आले व 16 वैज्ञानिक रांगोळ्या सादर करण्यात आल्या. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे समन्वयक मदन हराळ पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हायस्कूलचे प्राचार्य संजय सोरटे सर होते. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका शेख मॅडम, पर्यवेक्षिका श्रीमती जगताप मॅडम, पर्यवेक्षक चांदगुडे सर, पर्यवेक्षिका कांबळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
विज्ञान प्रदर्शन प्रमुख म्हणून अरुण राऊत सर यांनी काम पाहिले. त्यांना विद्यालयातील विज्ञान शिक्षक रासकर सर, भुजबळ सर, प्रभाकर झगडे सर, बोराटे सर, श्रीमती देवकर मॅडम, श्रीमती मगर मॅडम, श्रीमती जाधव मॅडम, श्रीमती शिंदे मॅडम, श्रीमती वाघमारे मॅडम यांचे सहकार्य लाभले. विज्ञान प्रदर्शन दुपार सत्रातील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने पाहिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण राऊत सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक झगडे सर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार संताराम ढावरे सर यांनी मानले.

