प्रतिनिधी मोहन शेगर,
अहमदनगर - नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांची भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांची नियुक्ती झाली. यानिमित्त त्यांचा त्यांचा स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे सत्कार करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पोहेकॉ. अजय गव्हाणे, पोहेकॉ. दिलीप शिंदे, पोहेकॉ. प्रमोद लहारे आदी उपस्थित होते. मुलगीर यापूर्वी पाथर्डी नंतर भिंगार कॅम्प येथे रुजू झाले. "स्नेहबंध'चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, आदर्श समाज निर्मिती आणि जनहितासाठी मुलगीर यांच्याकडून विधायक क्षेत्रात भरीव असे समाजकार्य होईल. त्यांना नूतन कार्यासाठी शुभेच्छा.
नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांचा 'स्नेहबंध'तर्फे सत्कार करतांना अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, अजय गव्हाणे, दिलीप शिंदे, प्रमोद लहारे

